*वराडा येथे फिर्यादी यांच्या शेतात बांधलेली एक बैल व जरशी गाय चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १२ किलो मीटर अंतरावर असलेल्या वराडा येथील फिर्यादी यांच्या मालकीच्या शेतातुन कोणीतरी अज्ञात चोराने बांधलेली एक बैल व जरशी गाय चोरी करुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार दिनांक ८ एप्रिल चे रात्री ७:०० वाजता ते शनिवार दिनांक ९ एप्रिल चे सकाळी ६:०० वाजता फिर्यादी योगेश प्रभाकर चिखले राहणार वराडा यांच्या मालकीचे एक बैल व एक जरशी गाय लाल रंगाची शेतातील झोपडीत बांधुन ठेवलेले अंदाजे किंमत ४०,००० रुपए चा माल कोणीतरी अज्ञात आरोपी ने चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी योगेश प्रभाकर चिखले यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज