Breaking News

*कोंढाळी सह परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी*

*कोंढाळी सह परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी*

कोंढाळी वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
काटोल- कोविड च्या वैश्विक महामारी नंतर आता हनुमान भक्तांकडून १६एप्रिल शनिवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खरे तर हनुमंत आणि शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी  जुळून आलाय खास योग! मानल्या जात असल्याने या वेळच्या हनुमान जयंती ला फारच महत्व प्राप्त झाले आहे.
चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशी येथील विकास नगर व दुधाळा येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.१६ एप्रिल रोजी हनुमान जयंती शनिवार या दिवशी आली आहे. अशा स्थितीत त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण मंगळवार आणि शनिवार हनुमंताला समर्पित मानले जातात. येथील विकास नगर येथे सकाळी 05-45पासुनच हनुमान जयंतीची शुभ वेळ आणि पूजेची सुरूवात करण्यात आली होती ।
पंचांगा नुसार या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी रवि आणि हर्ष योगाचा योगही जुळून येत आहे. यासोबतच हस्त आणि चित्रा नक्षत्राचाही योगायोग आहे असे मानले जाते की रवि योगात केलेले कोणतेही काम शुभ फळ देते.  अशी माहीती पंडित गणेशप्रसाद पांडे यांनी दिली.
येथील विकास नगर यथे या प्रसंगी होम-हवन करण्यात आले तसेच महामंडळा प्रसादा प्रसंगी हजारों सर्व धर्मीयांनी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।
कोंढाळी येथील उमाठे नगर, राऊतपुरा, बाजार चौक,टाका देवस्थान, पांढरीचा मारोती ठवळे पुरा, शनिवार पेठ, हनुमान नगर, शिरमी, सायखोड, सोनपुर दुधाळा, सह या परिसरातील बहुतेक सर्वच गावां मधे हनुमान जयंती उत्सव पार पडला ।
येथील साई मंदीर परिसरातील शनिदेवाचे मूर्ति ची पुजा करण्या आली।

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …