Breaking News

*अखेर त्या निंदनीय कृत्याचा सामाजिक बहिष्कार* *विविध सामाजिक संघटनांची मागणी*

*अखेर त्या निंदनीय कृत्याचा सामाजिक बहिष्कार*

*विविध सामाजिक संघटनांची मागणी*

रामटेक तालुका प्रतिनिधी: पंकज चौधरी
रामटेक – शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून सुरू असून रामटेक येथील विविध सामाजिक संघटनांनी आज आपला जाहीर निषेध नोंदवत राकेश मर्जीवेवर सामाजिक बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक, आकाशझेप फाऊंडेशन, रामटेक, परीवर्तन विचार मंच, रामटेक, तनिष्का व्यासपीठ, सकाळ समुह, शितलवाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, रामटेक व राष्ट्रीय ग्राहक मंच शाखा, रामटेक या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस निरीक्षक रामटेक यांना लेखी निवेदन देण्यात आले. पत्रकार राकेश मर्जीवे याने १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला त्वरित अटक करून pocso कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे परंतु सदर व्यक्तीकडून अनेक वेळा हा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले असून समाजाने अशा वाईट प्रवृत्तीचा केवळ निषेध करून चालणार नाही तर त्याचा जाहीर सामाजिक बहिष्कार केला पाहिजे ही लोकभावना सदर निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

सदर व्यक्ती भुषवित असलेली सर्व पदे रद्द करून समाजातील नागरिक, अधिकारी व पदाधिकारी यांनी कोणताही मानसन्मान सदर व्यक्तीला यापुढे देऊ नये व गुन्ह्याची वारंवारीता लक्षात घेता त्यास हद्दपार करावे अशी मागणी सर्व सामाजिक संघटनांनी केलेली आहे. यावेळी रामटेकचे समतादूत राजेश राठोड, मौदा समतादूत ओमप्रकाश डोले, दुर्योधन बगमारे, आकाशझेप फाऊंडेशनचे सचिव साक्षोधन कडबे, तनिष्का व्यासपीठाच्या गटसमन्वयक योगिता गायकवाड, शुभा थुलकर, शिक्षिका जया राठोड, अनुपमा बिसने, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्षा दिपा चव्हाण, सरला नाईक, अर्चना मेश्राम, परिवर्तन विचार मंचाचे सचिव राहुल जोहरे, ओंकार खोब्रागडे, सुरेंद्र सांगोडे, मंगेश कठौते, दिनेश मुन, विद्या मुन, राष्ट्रीय ग्राहक मंच रामटेकच्या अध्यक्षा कांचनमाला माकडे, ममता चौधरी, अल्का मेश्राम, मंदा कुल्लरकर, अंगणवाडी सेविका अनुपमा बिसने, आम्रपाली भिवगडे, पत्रकार त्रिलोक मेहर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …