*शौचालयात विद्युत सुविधा व नियमित स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील शौचालय सुरु करण्याची मागणी*
*कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांचे नप मुख्याधिकारी यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत शिवपंचायत हनुमान मंदिर च्या मागे कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला नगर परिषद प्रशासनाने नागरिकां करिता शौचालय सुरू केले परंतु शौचालयात विद्युत लाईट , पाण्याची सुविधा नसुन नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी चे साम्राज्य निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुंदे यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करून तात्काळ शौचालयात विद्युत लाईट लावुन प्रकाश व्यवस्था व पाण्याची सुविधा उपलब्ध करून नियमित साफ सफाई करून स्वच्छता ठेवण्याची तसेच प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील नवनिर्माण शौचालय त्वरित सुरु करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे.
मागील वर्षी कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासन द्वारे गांधी चौक शिवपंचायत हनुमान मंदिर च्या मागे कन्हान पोलीस स्टेशनच्या बाजुला शौचालय निर्माण करून सुरू करण्यात आले. परंतु या शौचालयात नप प्रशासनाने विद्युत लाईट प्रकाश व्यवस्था व पाण्याची सुविधा उपलब्ध न केल्याने या शौचालयाची व्यवस्था पुर्णपणे विस्तळीत झाली आहे. लागुनच पोलीस स्टेशन व मार्केट परिसर असल्याने शौचालयाचा नागरिक दिवस रात्र सातत्याने वापर करतात परंतु विद्युत प्रकाश व्यवस्था व पाण्याची सुविधा नसल्याने आणि नियमित साफ सफाई होत नसुन अस्वच्छतेने शौचालयाची दुर्गंधी संपुर्ण परिसरात पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. याच परिसरात मोठ मोठे साप व घातक सरपटणारे प्राणी सतत निघत असतात. मागील काही महिन्या पुर्वी भरदिवसा शौचालयात मोठा धामन साप निघाला होता. याची तक्रार नगरपरिषद प्रशासन ला सुद्धा करण्यात आली होती. परंतु नगरपरिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करित आता पर्यंत शौचालयात लाईटाची सुविधा उपलब्ध न केल्या ने रात्रीच्या वेळी सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नगरपरिषद प्रशासनाने दुसरे सार्वजनिक शौचालय प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सुध्दा करून बरेच दिवस झाले तरी लोकांना वापरा करिता सुरू करण्यात न आल्याने बाहेर गावा वरून आलेल्या नागरिकांना व फुटपाथ दुकानदारांना शौचालया करिता कुठे जायचे ? असा प्रश्न निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नगर परिषद मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांना भेटुन या गंभीर समस्येवर चर्चा करून तात्काळ शौचालयात विद्युत लाईट प्रकाश व्यवस्था , पाण्याची सुविधा
उपलब्ध करून नियमित साफ सफाई करून स्वच्छता ठेवावी आणि प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील नवनिर्माण बंद असलेले शौचालय त्वरित सुरू करण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे.
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे, हरीओम प्रकाश नारायण, कृणाल राजपुत सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज