*पारशिवनी येथे महंगाई च्या विरोधात काॅंग्रेस चे जोरदार प्रदर्शन*
*तहसीलदार मार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठवुन महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – देशातील जनतेच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकनाऱ्या केंद्रातील भाजपा सरकार विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा.श्री नानाभाऊ पटोले व नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मा.श्री. राजेंद्र मुळक यांच्या मार्गदर्शनात पारशिवनी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषद सर्कल , गोंडेगाव जिल्हा परिषद सर्कल , करंभाड जिल्हा परिषद सर्कल , माऊली जिल्हा परिषद सर्कल मध्ये नुक्कड सभा संपन्न झाले. त्यानंतर पारशिवनी तहसील कार्यालय येथे महंगाई कमी करण्याच्या संदर्भात सोमवार ला पारशिवनी तहसील कार्यालय समोर जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.रश्मीताई बर्वे व पारशिवनी तालुका काॅंग्रेस कमेटी चे अध्यक्ष मा.श्री.दयाराम भोयर यांच्या नेतृत्वात केंन्द्रातील भाजपा शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्फत केंन्द्र शासनाला निवेदन पाठवुन तात्काळ महंगाई दरवाढ कमी करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी जिल्हा परिषद सर्कल सदस्या सौ.अर्चनाताई भोयर , पंचायत समिति सर्कल सौ. मंगलाताई निंबोने , अशोक चिखले , शिवहरी भड , देविदास जामदार , दिपक भोयर , बंटी निंबोने , संजय निंबाळकर , कमलाकर कोटेकर , प्रदीप दियेवार , नारायण तायवाडे , नारायण डोईफोडे , गोपाल बोरडे , नरेश ढोणे , इंन्द्रपाल गोरले , रमेश महालगावे , शैलेश शिंदेकर , देवा डोंगरे , रवींद्र गुडदे , दिवाकर काळे , वनिता गेडाम , आशा बागडे , ममता निंबोने सह आदि काॅंग्रेस पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .