*मोठी बातमी*
*कन्हान थानेदार विलास काळे यांनी आनंद नायडु ला केली माराहण , संतप्त नागरिकांनी केला पोलीस स्टेशन चा घेराव*
*गरेज मालक आंनद नायडु ची पत्रपरिषद घेऊन प्रकरण दाखल करण्याची न्यायायी मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अवैद्य धंद्याचा बोलबाला असुन आरोपी पकडण्यास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा नागपुर ग्रामीण ला सहकार्य करण्याऱ्या गॅरेज चालकास पोलीस स्टेशन ला रात्री बोलावुन थानेदार विलास काळे माननी आनंद नायडु यांना मारहाण केल्याने संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन चा घेराव करून कन्हान थानेदार विलास काळे यांचा वर हेतुपुरसपर मारहाण केल्याचा आरोप करून गॅरेज चालक आंनंद नायडु यांच्यावर झालेल्या अन्याया विरूध्द कन्हान थानेदार विलास काळे यांचेवर गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली आहे .
कन्हान औद्योगिक शहर म्हणुन ओळखले जात असुन कन्हान मध्ये औद्योगिक संस्था हळूहळू बंद होत असतांना कन्हान पोलीस स्टेशनला “रक्षकच भक्षक” ची भुमिका थानेदार विलास काळे करित वरिष्ठाच्या आशिर्वादाने अवैध धंद्यांना संरक्षण दिले जात असुन कोळसा , रेती , लोंखंड , डिझेल , घरफोडी , चोऱ्या वाढुन नियमांना धाब्यावर टागुन सट्टा , जुआ , अवैद्य दारू , नसिले पदार्थ विक्री बिनधास्त असल्याने असामाजिक तत्वाला ऊत येऊन सर्व सामान्य नागरिकांना जगणे कठीण हो़त आहे. गुन्हेगारास पाठीला व फिर्यादीस वेठीस धरल्या जात असल्याने परिसरात शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी कन्हान कांद्री सीमेवर असलेल्या दिल्ली बिअर बार मध्ये मारपीट व दरोडाचे फरार आरोपी पकडण्यास गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण ला मदत केल्याने गॅरेज चालक आनंद नायडू आणि आंनद डिझेल रिपेअरिंगचे ऑपरेटर सचिन यादव यास सोमवार (दि.२५) एप्रिल ला कन्हान थानेदार विलास काळे यांनी पोलीस स्टेशन ला आपल्या चेंबरमध्ये रात्री १०.३० वाजता बोलावुन शिवीगाळ करून तुझा बाप कोण आहे ? म्हणुन बेधम मारहाण केल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करित थानेदार विरूध्द संताप व्यक्त करित फिर्यादीची वैद्यकीय तपासणी करिता नेले असता प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या डॉक्टरानी नागपूर च्या शासकीय रुग्णालयात पाठविल्याने तेथील वैद्यकीय तपासणीत मारहाणीच्या घटनेला दुजोरा मिळाला आहे. यामुळे गुन्हा नसतांना कन्हान थानेदार विलास काळे यानी हेतुपुरसपर बाजीरावने हातावर व हाता ने कानावर मारल्याने झालेल्या दुखापती च्या अन्याया विरूध्द गॅरेज चालक आंनंद नायडु हयानी पत्रपरिषद घेऊन कन्हान थानेदार विलास काळे विरूध्द गुन्हा दाखल करून न्यायाची मागणी केली असुन न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने जन आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पत्रपरिषदेला कॉंग्रेस कमेटी नागपुर ग्रामिण उपाध्यक्ष नरेश बर्वे , नगरपरिषद विरोधी गट नेता मनिष भिवगडे , माजी न प उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी , महिला काॅंग्रेस अध्यक्षा रिता बर्वे , नगरसेविका गुंफा तिडके , पुष्पा कावडकर , रेखा टोहणे , अमोल प्रसाद , प्रशांत मसार , सतिष भसारकर , रामचंद्र कुशवाह, औसत शेख , नागेश्वर आकरे , अमित सिंग , प्रताप सिंह राजपुत , कुलदिप सिंग भंडारी , रोहीत माहुल , सुनिल आंबागडे सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .