Breaking News

*शहर विकास मंच द्वारे महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा* *कामगारांचा सत्कार करुन कार्यक्रम थाटात संपन्न*

*शहर विकास मंच द्वारे महाराष्ट्र व कामगार दिवस थाटात साजरा*

*कामगारांचा सत्कार करुन कार्यक्रम थाटात संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस यांच्या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत कामगारांचा सत्कार करुन महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला .


१ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते व प्रभाकर रुंघे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत सावळे व मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे यांनी महाराष्ट्र व कामगार दिवस निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले .


त्यानंतर कार्यक्रमात स्वप्नील वरखडे , शुभम नागमोते , हर्षल नेवरे , सुरज तांदुळकर ह्या कामगारांचा नोटबुक , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ॠषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , हरीओम प्रकाश नारायण , शाहरुख खान , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , वैभव थोरात , प्रवीण हुड सह आदि मंच पदाधिकार्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र साबरे यांनी केले तर आभार महेश शेंडे यांनी मानले .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …