*”फॅशन रनवे शो च्या माध्यमातून महिलांचा विशेष सन्मान, वन स्टेज इव्हेंट चे आयोजन “*

*”फॅशन रनवे शो च्या माध्यमातून महिलांचा विशेष सन्मान, वन स्टेज इव्हेंट चे आयोजन “*

विशेष प्रतिनिधि

रिसोड – महिलांना ठराविक परिघातून बाहेर पडून स्वतःचा खास आनंद घेता यावा आणि लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्धेशाने रिसोड येथे वन स्टेज इव्हेंट & एंटरटेनमेंट कंपनीने ८ मे ला “फॅशन रनवे शो आणि महिलांचा सन्मान सोहळा ” चे आयोजन केले होते .जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन रिसोड येथील जि .बी लॉन येथे या कार्यक्रमात मिस, मिसेस, लहान मुले आणि मॉम & किड्स अशा क्याट्यागिरीजमधे स्पर्धा घेण्यात आल्या.

या शो चे दिग्दर्शक शुभम अग्रवाल होते. या कार्यक्रमाच्या माध्यमाने ११२ डायल- निर्भया पथक ची जागरूकता करण्यात आली . तसेच महाराष्ट्र पोलीस विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंघ ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गवई सर, नगरअध्यक्ष आसनकर मॅडम, वाशीम सीआयडी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी मोरे पाटील आणि निर्भया पथकच्या महिला पोलीस विशेष अतिथी म्हणून उपस्थीत होत्या.


निर्भया पथकातील पोलिस महिलांनी केलेला रॅम्प वॉक या वेळी विशेष आकर्षण ठरले. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षकानी सादर केलेल्या कवितेलही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

किड्स कॅटेगेरीयस मधून श्रेया दुबे, मिस कॅटेगेरीयस मधून श्यामा बोरा, मिसेस कॅटेगेरीयस मधून प्रेरणा पवार तर मॉम & किड्स कॅटेगेरीयस मधून पायल & मिष्टी रंनपरिया यांनी फॅशन रनवे चा किताब पटकावला. स्पर्धेचे परीक्षण मॉडेल खुशबू पटारीया आणि वैशाली भगत यांनी केले तर सूत्र संचालन अतुल चव्हाण यांनी केले.

रिसोड, वाशिम आणि आसपासच्या परिसरातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या रॅम्प वॉक ने उपस्थितांची मने जिंकली. लहानांपासून मोठयापर्यंत जवळपास 80 स्पर्धक यामधे सहभागी झाले होते. तर रिसोड आणि वाशिम मधील अनेक प्रतिष्ठित नागरिकांसह शेकडोंच्या संख्येने प्रेक्षकानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. असे कार्यक्रम नेहमी होत राहिल्यास आपल्या परिसरातील कलाकारांना प्रोत्साहन मिळेल असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शीतल अग्रवाल, भावना रत्नपारखी, कोमल अग्रवाल, यांचे विशेष सहकार्य लागले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …