*फोन करून क्रेडीट कार्ड मधुन १ लाख ४४ हजार ९४५ रूपये काढुन फिर्यादीची केली फसवणुक*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १.५ किलो मीटर अंतरावर असलेल्या शिवाजी नगर कन्हान येथील रहिवासी तेजप्रकाश तिवारी यांच्या क्रेडिट कार्ड चे खात्यातुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने १,४४,९९५ रूपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.९) मे ला रात्री ७ वाजता दरम्यान तेजप्रकाश दिलहरण तिवारी वय ३४ वर्ष राह. शिवाजी नगर कन्हान हे आपल्या घरी हजर असतांना मो.क्र. ९०९१३६५५९८ या फोन नंबर वरून तेजप्रकाश तिवारी यांना मो.क्र.९५४५६४६१०५ वर फोन करून म्हटले की, मी अँक्सीस बँक मुंबई येथुन बँक अधिकारी बोलतो असे म्हणुन तुमचे क्रेडीट कार्ड वर रिवार्ड पाईंट मिळाले आहे. तुम्ही जर ते युझ केले तर तुम्हाला गिफ्ट वाउचर मिळेल असे आमिष दाखवुन तेजप्रकाश तिवारी यांच्या मोबाईल वर लिंक पाठवुन त्या लिंक ला ओपन करण्यास लावुन एक ओटीपी आला. तो आरोपीस पाठविला असता तेजप्रकाश तिवारी च्या क्रेडीट कार्ड चे खात्यातुन १,४४,९९६ रूपये काढुन त्यांची फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी तेजप्रकाश तिवारी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र २७९ /२०२२ कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (ड) मा.तं. अधि. अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहेो.