Breaking News

*मांगगारोडी समाजाच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी* *अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती यांचे आमदार प्रणिती शिंदे ह्यांना निवेदन*

*मांगगारोडी समाजाच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी*

*अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती यांचे आमदार प्रणिती शिंदे ह्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती कल्या़ण समिती अध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे हयाना अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती नागपुर जिल्हा व्दारे मांगगारोडी समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती नागपुर जिल्हा व्दारे समाजाच्या विविध समस्या सोडवुन न्याय देण्याकरिता अनुसुचित जाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्षा आमदार मा. प्रणिती शिंदे हयाना शिष्टमंडळ भेटुन समाजा च्या विविध मागण्या संदर्भात निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली. या वेळी अध्यक्षा प्रणिती शिंदे हयानी बार्टी मार्फत समाज कल्याण्याच्या योजना महाराष्ट्रात राबवु असे आश्वासन दिले . आणि घुमतु व अर्ध घुमतु समाजास राष्ट्रीय प्रवाहात आणु त्याच्या समोयोचित विकास करू अशी ग्वाही दिली.


या प्रसंगी अखिल भारतीय मांगगारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती नागपुर जिल्हा चे नेवालाल पात्रे , रविंद्र लोंढे , अतुल पात्रे , अश्विन शेंडे , विनोद शेंडे , अनिकेत खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …