*कन्हान नदी पात्रात धार्मिक ग्रंथ, पुस्तके विसर्जन करण्यास आलेल्या दोन भावा पैकी एका भावाचा पाण्यात बुडुन मृत्यु*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग चा गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान परिसरातील सत्रापुर कालीघाट शिवारातील कन्हान नदी पात्राच्या ढोल्याजवळ धार्मिक ग्रंथ व पुस्तके विसर्जन करण्यास आलेल्या दोन भावा पैकी एका भावाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.१७) मे २०२२ ला सकाळी ७ वाजता ताज नगर टेका नांका नागपुर येथुन दोघे भाऊ कन्हान सत्रापुर कालीघाट शिवारातील कन्हान नदी पात्राच्या ढोल्याजवळ धार्मिक ग्रंथ व पुस्तके विसर्जन करण्यासाठी आले होते. धार्मिक ग्रंथ व पुस्तके नदी पात्रात विसर्जन केल्यावर नदीत आंघोळ करण्याचा मोह टाळुन शकल्याने आंघोळ करण्यास पाण्यात उतरले असता एका भावाचा पाय घसरून संतुलन बिघडुन नदी पात्रात वाहत खोल पाण्यात जाऊन आमिर रजा मोहम्मद बशीर शेख वय २७ वर्ष राहणार. ताज नगर टेका नाका नागपुर यांचा पाण्यात बुडुन मुत्यु झाला. तर दुसरा भाऊ अकरम रजा वल्द मो बशीर शेख वाचविण्यास गेला असता त्यास सुचेनाचे झाल्याने तो किणाऱ्याला लागल्याने वाचला .

सदर घटनेची माहीती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन बुडालेल्या युवकाचा कोळी बांधवा व्दारे नदी पात्रात शोध घेतला असता दुपारी १२ वाजता दरम्यान आमिर चा मुत्युदेह मिळाल्याने कन्हान पोलीस स्टेशन चे हेड काॅंस्टेबल मोहन शेळके , विरेंद्र चौधरी हयानी कामठी ग्रामिण उपजिल्हा रूग्णालयात नेऊन शवविच्छेदन करून त्याच्या नातेवाईकांना मुत्युदेह सोपविण्यात आले .

सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी अकरम रजा वल्द मो बशीर शेख यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन कन्हान पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .
Maharashtra News Media सच की आवाज