Breaking News

*सोसायटीचे कार्य करीत असतांना दोन आरोपींनी फिर्यादी व पत्नी , मुलीला माराहण करुन केले जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*सोसायटीचे कार्य करीत असतांना दोन आरोपींनी फिर्यादी व पत्नी , मुलीला माराहण करुन केले जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किलो मीटर अंतरावरील खंडाळा (निलज) येथे विना कारण दोन आरोपीतांनी संगमत करून धर्मराज वाघमारे ला व त्याची पत्नी , मुलीला मारहान करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


खंडाळा (निलज) येथील रहिवासी धर्मराज वाघमारे व १) अक्षय ताराचंद पानतावने, २) ताराचंद पानतावने हे एकाच मोहल्यात राहत असुन रविवार (दि.१५) मे ला रात्री १०:३० ते १०:४५ वाजता दरम्यान सोसायटीचे पैश्याची वाटणी सुरू असतांना अक्षय ताराचंद पानतावने व ताराचंद पानतावने हे धर्मराज वाघमारे जवळ आले व म्हणाले कि ” तु जास्त हुशार बनला का ” असे बोलुन विना कारण धर्मराज वाघमारे यांना व त्यांची पत्नी व मुलीला दोघानी संगमत करून लाकडी काठीने व हातबुक्याने मारपीट केली. त्यात मुलीचा गळ्याला व छाती खाली मार लागल्याने आणि धर्मराज वाघमारे यांच्या उजव्या पायाचा मांडीला व खांद्याला मार लागल्याने तसेचे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी धर्मराज वाघमारे यांच्या तोंडी तक्रारी वरून व डाॅक्टर च्या वैद्यकीय अहवाला वरून दोन्ही आरोपी १) अक्षय ताराचंद पानतावने, २) ताराचंद पानतावने विरुद्ध कल म ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …