Breaking News

*शेतात खुटया गाडतांना भावा भावात भांडण व मारहान* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*शेतात खुटया गाडतांना भावा भावात भांडण व मारहान*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किलो मीटर अंतरावरील बोरडा ( गणेशी) येथील शेतात खुट्या गाडण्यास गेले असता भावाभावात भांडण करून दोन आरोपींनी मारहान करून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.


प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.८) मे २०२२ ला सकाळी ८ ते ८:३० वाजता दरम्यान बोरडा (गणेशी) येथील क्रिष्णा सोनबाजी कुहिटे हे आपल्या शेताची मोजणी करून शेतात मारकिंग केलेल्या जागेवर खुट्या गाडण्या करिता मजुरा सोबत गेले असता १) पांडुरंग सोनबाजी कुहिटे, २) पवन सोनबाजी कुहिटे हे तिथे आले व खुटी गाडण्यास मनाई भावाभावात बाचा बाची होत भांडण झाला असता पांडुरंग हा क्रिष्णाच्या अंगावर धाऊन आला व त्याने लात मारली असता क्रिष्णा कुहिटे यांनी पकडली. तो खाली पडला हे पाहुण पवन कुहीटे याने क्रिष्णास मागुन पकडुन खाली आधडले. त्यामुळे क्रिष्णा च्या डाव्या मोंड्याला, पसडी ला जबर मार लागल्याने जबर मुका मार लागुन जख्मी झाले. अश्या फिर्यादी क्रिष्णा कुहिटे यांच्या तोंडी तक्रारी वरून व डाॅक्टर च्या अहवाल नुसार पोलीस निरिक्ष क यांच्या आदेशाने कन्हान पोलीसांनी आरोपी १) पांडुरंग सोनबाजी कुहिटे, २) पवन सोनबाजी कुहिटे या दोघा विरुद्ध कलम ३२३, ३२५, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्ग दर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …