*बी.के.सी.पी.स्पोर्टस एकेडमी कन्हान चे खासदार क्रीडा महोत्सवात उत्कुष्ट प्रदर्शन*
*स्वर्ण पदक १५, रजत पदक ११, कांस्य पदक १६ असे ४२ पदक प्राप्त केले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – “खासदार क्रीडा महोत्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धेत कन्हान शहरातील बी.के.सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेडमी कन्हान च्या खेळाडुंनी कला कौशल्य सादर करित उत्कृष्ट प्रदर्शन करून स्वर्ण पदक १५, रजत पदक ११ व कांस्य पदक १६ असे एकुण ४२ पदक प्राप्त करून विजय मिळवुन शाळेचे व कन्हान शहराचे नाव लौकीक केल्याने खेडाळु विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे .
केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या संकल्पने तुन नागपुर शहरात आयोजित “ खासदार क्रीडा महोत्सव २०२२” अंतर्गत विविध एथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात जिल्हयातील विविध शाळा, अँकेडमी च्या ८० च्या वर संघाने आणि हजारो पेक्षा जास्त विद्यार्थ्यी, खेळाडुंनी सहभाग घेतला. या एथलेटिक्स स्पर्धेत कन्हान शहरातील बी.के. सी.पी. स्कुल स्पोर्ट्स एकेडमी कन्हान च्या खेळाडुंनी क्रिडा शिक्षक अमितसिंह ठाकुर सर, क्रिडा शिक्षिका सविता वानखेडे, शिक्षिका रेनु राऊत यांच्या मार्गदर्शनात अति उत्तम कला कौसल्य सादर करित खेळुन उत्कृष्ट प्रदर्शन करून स्वर्ण पदक १५, रजत पदक ११ व कांस्य पदक १६ असे एकुण ४२ पदक प्राप्त करित विजय मिळवुन शाळेचे व कन्हान शहराचे नाव लौकीक केल्याने बी.के.सी.पी.स्कुल चे संचालक श्री राजीव खंडेलवाल , व्यवस्थापन समिती सदस्या श्रीमती पुष्पा गैरोला , मुख्याध्यापिका (माध्यमिक) श्रीमती कविता नाथ व मुख्याध्यापिका (प्राथमिक) जुलियाना राव आणि सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आदीने विजेता विद्यार्थी खेळाडु व क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक अमित सिंह ठाकुर , क्रिडा शिक्षिका सविता वानखेड़े , शिक्षिका रेनु राऊत आदीचे अभिनंदन करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कन्हान परिसरातुन विद्यार्थ्यी खेडाळुचे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे .