Breaking News

*राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत पद्धतीने लावलेल्या दुकानाची सफाई. टोल प्लाझा खुमारी यांची कार्यवाही*

*राष्ट्रीय महामार्गावर अनधिकृत पद्धतीने लावलेल्या दुकानाची सफाई.
टोल प्लाझा खुमारी यांची कार्यवाही*

रामटेक तालुका प्रतिनिधी :- पंकज चौधरी

नागपूर- जबलपूर महामार्गावर मनसर वरून 5 कि. मी.अंतरावर असलेल्या महाराष्ट्र चेक पोस्ट (बॉर्डर) जवळील महामार्गावर अनधिकृतपणे लावलेल्या दुकानांना आज दि.27/05/2022 ला टोल प्लाझा खुमारी यांच्यामार्फत महामार्ग पोलीस यांच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या सर्व दुकानांची सफाई करण्यात आली.

 

नागपूर – जबलपूर महामार्गावर कान्द्री परिसरात महाराष्ट्र चेक पोस्ट (बॉर्डर) असल्याने या ठिकाणी अनेक मोठमोठे वाहने याठिकाणी थांबत असतात.हे सर्व वाहने रस्त्याच्या बाजूला उभे असल्याने याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.व सतत वाहने उभे असल्याने यानंतरही अपघात होण्याची दाट शक्यता आहे.यासाठी टोल प्लाझा खुमारी यांच्या कडून महामार्ग पोलिसांच्या मदतीने तब्बल 10 दुकाने हटविण्यात टोल प्लाझा यांना यश आले आहे.यात प्रामुख्याने टोल प्लाझा खुमारी येथील मॅनेजर अतुल आदमने,आकाश यादव,गजेंद्र लोखंडे,चेतन नंदेश्वर, संदीप सोमकुवर, संजय मोहर्ले, प्रशांत नारनवरे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …