Breaking News

*कन्हान येथे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाहिली श्रद्धांजलि*

*कन्हान येथे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाहिली श्रद्धांजलि*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर येथे देशाचे पहिले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ५८ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली
शुक्रवार दिनांक २७ मई ला देशाचे पहिले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ५८ व्या पुण्यतिथि निमित्य कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषराव घोगले व प्रमुख अतिथि दिनकरराव मस्के , मनोहर कोल्हे सह आदि च्या हस्ते
देशाचे पहिले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित नागरिकांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन श्रद्धांजलि वाहुन पुण्यतिथि साजरी करण्यात आली .
या प्रसंगी एन के खानजोडे , उद्य पाटील , रवि राणे , अल्का कोल्हे , अशदा भुजाडे , कृणाल कोल्हे लिपीक , अविनाश कोल्हे , नितिन मोहणे , शुभम शेंडे , रवि वानखेडे , राहुल पारधी , अभिषेक निमजे , शुभम कावळे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले तर आभार कृणाल कोल्हे लिपीक यांनी मानले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …