*शेती, शेतकऱ्यांना व वन्य प्राण्याची सुरक्षा करून शेतीचे होणारे प्रचंड नुकसान थांबविण्याची मागणी*
*माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांचे सुनील लिमये , मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर जिल्हयातील संपुर्ण ग्रामिण भागात , जंगला लगत असल्याने वन्य प्राण्यांना जंगलात व्यवस्थित खाद्य मिळत नसल्याने तसेच वन्य विभागा व्दारे वन्य भागाची सिमा व्यवस्थित सिल करण्यात न आल्याने वन्य प्राणी भुकेपोटी जंगलातुन पोट भरण्या करिता वन्य परिसर लगत व दुरवर शेतशिवारात येऊन त्याना अडसर होणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला करून जख्मी करित शेतपिकाचे मोठया प्रमाणात नुकसान करित असल्याने या अत्यंत गंभीर समस्या विषयी मा. मुख्य वनसंरक्षक वन्यजीव हयाना शिवसेना माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव हयानी भेटुन लक्ष केंद्रित करून शेती , शेतकऱ्यांची व वन्य प्राण्याची सुरक्षा करण्याच्या ठोस उपाययोजना राबवुन शेतीचे होणारे प्रंचड नुकसान थाबवावे. ही मागणी करण्यात आली. नागपुर जिल्हयात वर्षभरच जंगली जनावरे (वन्य प्राणी) आणि सामान्य शेतकऱ्याचा संघर्ष होत असतो. अनेक शेतकरी जख्मी होतात तर अनेकाना जीव गमवावा लागतो. यात अनेक जंगली प्राण्याचाही जीव जातो. हे दुर्देवीच चित्र असुन नागपुर जिल्हयातील करांड अभयारण्य उमरेड, भिवापूर, कुही तालुक्यात आहे. बोर अभयारण्य हिंगणा लगत, पेंच अभयारण्य पारशिवनी,रामटेक, सावनेर तालुक्यात आहे . गोरेवाडा आंतरराष्ट्रीय पार्क आहे . जिल्हयातील ग्रामिण अनेक भागात ही वन , जंगल आहेच.
या सर्व जंगल भागाला लागुन लोक वसाहती आहेत. या भागातील मुळ व्यवसाय शेती आहे. जंगली जनावरे व शेतकऱ्याचा संघर्ष सातत्याचा होणे अटल आहे. अनेक घटना क्रमात अनेकांची जीवहानी झाली आहे. अनेकाना जख्मी होऊन विकलांगता आली आहे. या भागातील जंगली जनावरे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान करीत असतात . जनावराचे कळप एकाच रात्री संपुर्ण शेती फस्त करतात. रान डुक्कर व इतर प्राण्याचे शेतकऱ्यावर होणारे हमले जीवघेणे असतेच , पारशिवनी तालुक्यात जानेवारी, फेब्रुवारी २०२१ च्या दिड महिन्यात वराडा शेत शिवारात पेंच वन विभागाच्या बिबटयाने चारदा केले ल्या हल्यात ३ जर्शी कारवड, २ म्हशीचे वासरू ठार , १ वासरू जख्मी केले . तर डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या तीन महिन्यात कन्हान व पेंच नदी काठावरील पिपरी , गाडेघाट , जुनिकामठी , घाटरोहणा , गोंडेगाव कोळसा खदान , टेकाडी , वराडा , एसंबा , नांदगाव , बखारी , पटगोवारी परिसरात बिबटयाच्या १५ हल्यात १२ गावचे ४ गोरे, ८ जर्शी कारवडे, ३ म्हशीचे वासरू, ५ बकऱ्या, ४ कुत्रे असे २४ प्राळीव प्राणी ठार करून ११ जख्मी केल्याने पशुपालक शेतकऱ्यांचे भंयकर नुकसान होऊन वन विभागावर रोष होता. या बिबटयामुळे ग्रामस्थाच्या जिवितास सुध्दा धोका निर्माण झाला होता. तरी सुध्दा वन विभाग मुत प्राळीव प्राण्याचे पंच नामे व अहवाल बनवुन पाठविण्याचे कार्य केले. परंतु बिबटयास पकडुन जंगलात नेऊन सोडुन परिसरातील ग्रामस्थाना दिलासा देऊ शकले नसल्याने भीतीचे वातावरण व वन विभागा विषयी रोष निर्माण झाला होता. शेती व जंगली जनावरे आणि होणारे सततचे नुकसान यासाठी ठोस पावले उचलण्याचे बघण्यात येत नाही. तर सुरक्षा कशी मिळेल. जंगले टिकविणे जसे प्रथम स्थानी आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती व शेतकऱ्यांचा जीव सुरक्षित करणे अगत्याचे आहे . जंगल लगत लोखंडी जाळ्या , चर , संरक्षित काटेरी कुंपन अशा इतर ही युक्त्या व योजना राबविणे ही आपली जबाबदारीच आहे . जंगली जनावरांना लागणारे अन्न व पाणी जंगलातच उपलब्ध करणे ही गरज आहे. हे न मिळाल्यानेच ते शेती फस्त करून नुकसान करतात. शेतीची नुकसान भरपाई , जीव व अपघात भरपाई यासाठी आपणा कडुन कोणत्याही योजना राबविल्या जात नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. गाव व शेतकरी संपूर्ण ता सुरक्षित ठेवणे हि काळाची गरज आहे. वेळोवेळी जंगली जनावरामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई त्वरितच देण्यात यावी. या भयानक घटनेतुन योजना आखुन लोक सहभाग घेऊन हा संघर्ष संपवा वा. यासाठी तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. या अत्यंत गंभीर समस्या विषयी मा. सुनील लिमये साहेब, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, महाराष्ट्र राज्य हयाना शिवसेना माजी खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र व ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव यांनी भेटुन चर्चा करित लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांची व वन्य जीवाची सुरक्षा करण्याकरिता ठोस उपाय योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी उपसभापती विलास भोम्बले , पांडुरंग बुराडे , भारतीय कामगार सेना तालुका प्रमुख मंगेश चौरपगार , चंद्रशेखर नाईक , ज्ञानचंद देवले , अँड अशोक गौरी , राजु तुमसरे , राम गोरले , मोतीराम रहाटे , आकाश बोरकर , कैलास कोमरेल्लीवार , ओमप्रकाश काकडे , गजानन वरघणे , प्रकाश वारे , सतीश मुंजे , ईश्वर ठाकरे , प्रशांत पाहुणे , दिलीप चिखले , किशोर बेहुणे , दिंगाबर ठाकरे , मनोज वरखडे , रविंद्र चौधरी , विजय कांबळे , अतुल गोरले , आजाद दोरजे , सुरज काळे , शंकर छानिकर , अंकुश सय्याम , दिलीप चवले , कैलास घोडमारे , कुणाल देऊळकर आदीने उपस्थित राहुन मागणी केली आहे .