Breaking News

*बोरडा शेत शिवारातील फिर्यादी यांच्या शेतातील टिनाच्या शेड मधुन ५० गावरानी कोंबड्या चोरी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पो.स्टे. ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*बोरडा शेत शिवारातील फिर्यादी यांच्या शेतातील टिनाच्या शेड मधुन ५० गावरानी कोंबड्या चोरी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पो.स्टे. ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किलो मीटर अंतरावर मौजा बोरडा (गणेशी) शेत शिवारातील ज्ञानेश्वर मोहने यांच्या शेतातील टिनाच्या शेड मधुन कोणीतरी अज्ञात चोराने ५० गावरानी कोंबड्या चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार ज्ञानेश्वर घनश्याम मोहने वय ३९ वर्ष राहणार. बोरडा (गणेशी) यांची बोरडा शेत शिवारात दीड एकर शेती असुन शेतात कुक्कुट पालन कर ण्यासाठी टिनाचे शेड बांधले असुन त्यामध्ये पंचायत समिती पारशिवनी येथुन ८४ गावरानी कोंबड्या पाळण्यासाठी एप्रिल २०२२ मध्ये घेतल्या होत्या. त्यांचा चारापाणी व देखरेख ज्ञानेश्वर मोहने हे स्वता करीत असुन शुक्रवार (दि.२०) मे ला सकाळी ८ वाजता दरम्यान ज्ञानेश्वर मोहने हे शेतात गेले व कोंबड्यांना चारा पाणी देऊन दुपारी १२ वाजता घरी गेले. तेव्हा गावरानी ८४ कोंबड्या शेतातील टिनाच्या शेड मध्येच होत्या. काही वेळाने जेवन करून २.३० वाजता शेतातील टिनाच्या शेड मध्ये कोंबड्यांना चारापाणी देण्यासाठी गेले. तेव्हा ज्ञानेश्वर मोहने ला कोंबड्या कमी दिसल्या ने त्यांनी व्यवस्थित पाहनी केली तर ८४ गावरानी कोंबड्या पैकी ३४ कोंबड्या दिसल्या व ५० कोंबड्या न दिसल्याने ज्ञानेश्वर मोहने यांनी शेताचे जवळील लोकांना विचारपुस केली. आणि शोध घेतला तरी मिळुन न आल्याने शुक्रवार (दि.२०) मे ला दुपारी १२ ते २.३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने ज्ञानेश्वर मोहने यांच्या शेतातील टिनाच्या शेड मधुन गावरानी ५० कोंबड्या किमत अंदाजे १५,००० रूपया चा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी ज्ञानेश्वर मोहने यांच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ३१०/२०२२कलम ३७९, भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …