*पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी , अन्यथा तीव्र आंदोलन चा ईशारा* *युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांचे व नागरिकांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*

*पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी , अन्यथा तीव्र आंदोलन चा ईशारा*

*युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांचे व नागरिकांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद क्षेत्रात पाण्याची समस्या मागील दोन महिन्या पासुन वाढली असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन या कडे र्दुलक्ष करत असल्याने युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांनी व नागरिकांनी नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे .
परिसरातील प्रभाग क्रमांक ७ येथील पटेल नगर , शिवाजी नगर , स्वामी विवेकानंद नगर , सह आदि इतर प्रभागातील नागरिकांना मागील दोन महिण्या पासुन पाणी नियमित मिळत नाही आहे . ही समस्या मागील अनेक वर्षापासुन असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन या समस्या ला गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न करत असल्याने युवक काॅंग्रेस पदाधिकार्यांनी व नागरिकांनी नप नगरसेविका रेखा टोहणे यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्याची केली असता मुख्याधिकार्यांनी तीन ते चार दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले आहे . अन्यथा तीव्र आंदोलन चा ईशारा काॅग्रेस पार्टी च्या पदाधिकार्यांनी दिला आहे .
या प्रसंगी नगरसेवक विनय यादव , आकिब सिद्धिकी , अजय कापसीकर , प्रशांत मसार , सुनील मानकर , बालाजी नागपुरे , पुष्पा उमरकर , प्रमीला भगत , सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …