*गहुहिवरा मार्गावरून जड वाहतुक बंद करण्यास शिवसेना ने केले रस्ता रोको आंदोलन*
*जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पत्रकाला कन्हान पोलीस विभागाने दाखविली केराची टोपली*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गा वरून मागील अनेक दिवसा पासुन जड वाहतुक बिनधास्त सुरु असुन किती तरी निर्दोष लोक गंभीर जख्मी होत असल्याने काही दिवसा पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जड वाहतुक बंद चे आदेश पत्रक जारी केले असुन सुद्धा कन्हान पोलीस विभागाने त्या आदेशा ला केळाची टोपली दाखविल्याने मे महिन्यात गहुहिवरा मार्गावर दोन भीषण अपघात होऊन एक गंभीर जख्मी होऊन मृत्युशी झुंज देत असुन दुसऱ्याचा घटनास्थळीच मुत्यु झाल्याने शिवसेना कन्हान शहर तर्फे गहुहिवरा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन देऊन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली आहे.
-
कन्हान ते गहुहिवरा मार्गावर नागरिक सकाळ व सायंकाळी पायदळ फिरायला जात असुन दिवसभर नागरिकांचे ये-जा ची वर्दळ असुन सुद्धा या मार्गावरून गेल्या काही दिवसा पासुन कोळसा, रेती, कंटेनर ट्रक ची ओव्हर लोड जड वाहतुक सुरू आहे परंतु हा मार्ग १० ते १२ फुटाचे असुन या मार्गावरून जड वाहनांची वाहतुक सुरू असल्याने इतर वाहनांना, नागरिकांना येणे जाणे करण्यास चांगलीच सर्कस करून त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी विमला आर यांना करण्यात आल्याने त्यांनी सदर विषयाचे गंभीर्य लक्षात घेत एक पत्रक काढुन जड वाहतुक बंद करण्याचे आदेश दिले. त्या आदेशा ला कन्हान पोलीस विभागाने केळाची टोपली दाखविल्या ने या मे महिन्यात गहुहिवरा चाचेर मार्गावर २ मे ला व २४ मे ला झालेल्या दोन भीषण अपघातात गहुहिवरा चा युवक गंभीर जख्मी होऊन मुत्युशी झुंज देत आहे तर दुसऱ्या घटनेत कँनटेनर ट्रक चाचेर च्या सतीश धनराज श्रोते यांस चाकात घासत नेल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यु झाल्याने शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले व नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या नेतृत्वात गहुहिवरा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून पोलीस निरीक्षक विलास काळे यांना निवेदन देऊन तात्काळ जड वाहतुक बंद करण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी शिवसेना कन्हान शहर चे पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.