वर्चस्वच्या लढाईत मंगेशचा दगडाने ठेचुन केला गेम…
खापरखेडा प्रतिनिधी-दिलीप येवले
खापरखेड़ा:वर्चस्वच्या लढाईत मंगेशची दगडाने ठेचून हत्या. ही घटना नागपुर जिल्यातिल खापरखेडा पोलिस स्टेशन जवळ असणा-या वारेगाव सुरदेवी टी पॉइंटवर आज (रविवारी) १ डिसेंबर सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. मंगेश बागडे वय (२५) रा.साहोली असे मृतकाचे नाव तर राजेश पेंदाने (३३) सचिन चव्हाण (३२)दोन्ही रा.भानेगाव असे फरार झालेल्या दोन आरोपीचे नांव आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार मृतक मंगेश बागडे तसेच आरोपी राजेश पेंदाणे, व सचिण चव्हाण हे खापरखेडा परिसरात रेती तस्करी करायचे. मागील एक दीड वर्षांपूर्वी आरोपी पेंदाणे यास माऊजरने गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात मंगेश बागडे याला शिक्षा झाली होती. नुकताच शिक्षा भोगून घरी आलेल्या मृतक मंगेश आज सकाळी घरुन भानेगाव – पारशिवनी टि-पाईंट कडे पल्सर मोटरसायकल क्रमांक MH ४० AD ६९७९ ने गेला होता यावेळी तो अचानक वारेगावाकडे फिरायला गेला असताना त्याच्या मागावर असलेले आरोपी यांनी आपल्या बोलोरो MH ४० KR १४८९ ने मृतकाच्या गाडीला कट मारून मृतक मंगेश यास गाडीवरून पाडले. घटने दरम्यान मृतकाच्या पाठलाग करताना आरोपीची बोलेरो चे संतुलन बिघडल्यामुळे एका खड्ड्यात जाऊन आदळली.दरम्यान आरोपी बोलेरो गाडीतून उतरून मंगेश च्या मागे धावत जाउन त्याला दगडाने ठेचून रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या झटापटीत दोन्ही आरोपींचे माउझर हातातून पडले व त्यांनी तेथून पळ काढला.
यावेळी मार्गांनी येणा-या जाणा-यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. एका इंडिका कारने मंगेशला कामठी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी मंगेशला तपासले असता त्यास मृत घोषित केले.
त्यावेळी आरोपी लागलीच पसार झाले.पोलीस तपासात मृतक व आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल असून दोन्ही रेती तस्करांचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यामुळे रेतिच्या वादातूनच ही हत्या झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
बातमी लिहीपर्यंत अद्याप आरोपीला अटक झाली नव्हती. खापरखेडा पोलिसांनी माउझर जप्त केले असून फरार आरोपींचा शोध घेत आहे.