*कन्हान येथे शिवराज्यभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे शिवराज्यभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान : – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी महाराज स्मारक शिवाजी नगर कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण, पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा करण्यात आला.


सोमवार (दि.६) जुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन राजे शिवाजी महाराज स्मारक, शिवाजी नगर कन्हान येथे करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या हस्ते, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मंच पदाधिकाऱ्यानी राजे छत्रपती शिवाजी महाराजां यांच्या च्या प्रतिमेला पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शहर विकास मंच संस्थाप क अध्यक्ष ऋृषभ बावनकर, उपाध्यक्ष महेंद्र साबरे, सह सचिव प्रकाश कुर्वे, मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे, वामन येवले, हरीओम प्रकाश नारायण, अनुराग महल्ले, कृणाल राजपुत सह मंच पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …