*पारशिवनी तालुक्यात कु.जानवी सेवकराम भोंडे ९०.३३ टक्के प्रथम*

*कु.सानिका अनिल मंगर ८८:०० द्वितीय*
*शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी वृक्ष व पुष्प गुच्छ देऊन केले सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागा द्वारे बुधवार दिनांक ८ जुन बारावीचा निकाल जाहिर करण्यात आला. या मध्ये पारशिवनी तालुक्यातुन कन्हान-कांद्री येथील राहिवासी कु.जानवी सेवकराम भोंडे हिने प्रथम क्रमांक पटकावून ९०.३३ टक्के मिळवले व इंदिरा नगर कन्हान येथील रहिवासी कु. सानिका अनिल मंगर हिने द्वितीय क्रमांक पटकावून ८८.०० टक्के मिळवल्याने शिवसेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी शहर प्रमुख छोटु राणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कु.जानवी सेवकराम भोंडे व कु. सानिका अनिल मंगर यांच्या निवास स्थानी भेट देऊन विद्यार्थीनींचे व त्यांच्या आई वडिलांचे पुष्पगुच्छ व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आले व विद्यार्थीनीना मिठाई घालुन त्यांचे मनोबल वाढविण्यात आले .
या प्रसंगी शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटू राणे , नगरसेवक अनिल ठाकरे , चिंटू वाकुडकर, हरीश तिडके , भरत पगारे , अजय चव्हाण , विनोद पात्रे , समशेर पुरवले , सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज