Breaking News

*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी विजय जल्लोष साजरा केला*

*कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी विजय जल्लोष साजरा केला*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्रात झालेल्या राज्य सभेच्या सहापैकी तीन जागेवर भारतीय जनता पक्षाचे उम्मेवार विजय झाल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी फटाके फोडुन , एकमेकांना मिठाई घालुन विजयाचा जल्लोष साजरा केला .
शुक्रवार दिनांक १० जुन ला राजसभेच्या निवडुक होऊ घातले असल्याने दिवसभर शांततेत मतदान पार पडले . त्याच रात्री उशिरा पर्यंत मतगणना पार पडली . या निवडणुकी मध्ये
भाजप चे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव केला . याशिवाय अमरावतीचे डॉ . अनिल बोंडे व मुंबईचे पीयुष गोयल हेदेखील विजयी झाले . सहाव्या जागेसाठी चुरशीची लढत झाली . त्यात महाडिक यांनी विजय मिळविला . असे तीन उम्मेदवार भारतीय जनता पक्षाचे विजय झाल्याने कन्हान येथे भाजपा पदाधिकार्यांनी ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , , पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या नेतृत्वात फटाके फोडुन , एकमेकांना मिठाई घालुन विजयाचा जल्लोष साजरा केला .
या प्रसंगी राहुल किरपान , सुरेंद्र बुधे , सुनिल लाडेकर , विक्की सोलंकी , सौरभ पोटभरे , प्रतिक वैद्य , मनोज गिरी , नरेश मेश्राम , आशिष भुरसे , पारस यादव , मयुर माटे , सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …