*कन्हान येथे भाजपा द्वारे सेवा , सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा अभियान थाटात संपन्न* *भाजपा नेत्यांनी नागरिकांना विविध योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे केले आवाहन*

*कन्हान येथे भाजपा द्वारे सेवा , सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा अभियान थाटात संपन्न*

*भाजपा नेत्यांनी नागरिकांना विविध योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे केले आवाहन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – केंद्रातील मोदी सरकार ला ८ वर्ष पुर्ण झाल्याने ल्याने कन्हान येथे भाजपा द्वारे संपुर्ण परिसरात सेवा , सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा अभियान अंतर्गत नागरिकांना मोदी सरकार च्या विविध जनकल्याणकारी योजनेची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे व शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी नागरिकांना केले आहे.


केंद्रातील मोदीं सरकार च्या नेतृत्वातील भाजपा सरकार ला ८ वर्षे पुर्ण झाल्याने सेवा , सुशासन व गरीब कल्याण पंधरवाडा अभियाना अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करून जनकल्याणकारी आठ वर्षाच्या काळात केंद्राच्या वतीने लागु करण्यात आलेल्या विविध जन कल्याणकारी योजनांची माहिती देण्याकरीता सोमवार (दि.६) जुन ला सिहोरा येथे राजेंद्र मोरे यांच्या निवसास्थानी नागरिकांना मोदी सरकार च्या गरीब कल्याण योजनेची माहिती व शेतकरी संवाद सभेचे आयोजन करण्यात होते. मंगळवार (दि.७) जुन ला युवा संवाद सभेचे आयोजन शिवाजी नगर येथे कर ण्यात आले असुन बुधवार (दि.८) जुन ला महिला संवाद सभेचे आयोजन राजीव गांधी बालोद्यान पाणी टंकी परिसर हनुमान कन्हान येथे करण्यात आले होते. गुरुवार (दि.९) जुन ला ओबीसी संवाद सभेचे आयोजन हिराबाई कन्या विद्यालय स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथे करण्यात आले. शुक्रवार (दि.१०) जुन ला अनुसुचित जाती मोर्चा संवाद सभेचे आयोजन सुंदर बाई गजभिये ले आऊट नाका नंबर सात सरोज विश्व कर्मा यांचा घराजवळ करण्यात आले असुन शनिवार (दि.११) जुन ला अनुसूचित जमाती मोर्चा संवाद सभे चे आयोजन रायनगर येथे करण्यात आले होते.
या प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी केंद्र सरकार च्या जनधन योजन, आयुष्मान योजना, ई श्रम कार्ड योजना, हेल्थ कार्ड योजन, किसान सम्मान निधी योजना, शेतकरी पेंशन योजना, अटल पेंशन योजना, शेतकरी कुसुम योजना, पिकविमा योजना, माती परिक्षण योजना, स्वनिधी योजना, बेटी बचाव, बेटी पढाव योजना, सुकन्या योजना, वयोश्री योजना, मातृत्व वंदना योजना, अपघात विमा योजना, पिग्रम वाणी योजना, मोफत शिलाई मशीन योजना, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना सह विविध योजनांची माहिती उपस्थितांना देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले असुन भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासात्मक कामाची माहिती दिली कि देशात सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण करणे, आतंकवाद व दहशद वादावर नियंत्रण करणे, खेलो इंडिया योजने अंतर्गत खेळाडुंना प्रोत्साहन करणे, मुस्लीम महिलां करीता तीन तलाक कायदा निर्माण करणे, ३७० कलम हटविने, अयोध्येत राममंदिर निर्माण करणे, आत्मनिभर भारत योजने अंतर्गत कोरोना लसीकरण करणे, अन्न सुरक्षा योजना, अंतोदय योजना तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची नेतृत्व प्रतिमा उंचावण्याकरीता केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती, नविन शैक्षणिक धोरणा ची माहिती सह विविध माहिती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर यांनी तर आभार प्रदर्शन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष संजय रंगारी यांनी मानले. या प्रसंगी रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे , रिंकेश चवरे , माधव वैद्य , अमोल साकोरे , राजेश गणोरकर , विक्की सोलंकी , कामेश्वर शर्मा , रंजीत शिंदेकर , अजय लोंढे , मयुर माटे , ऋृषभ बावनकर , शैलेश शेळके , भरत साळवे , मुलचंद शिंदेकर , लिलाधर बर्वे , राजुभाऊ पाटील , नथ्थुजी चरडे , विनोद कोहळे , स्वाती पाठक , तुलेषा नानवटकर , सुषमा मस्के , सौ राखी परते , लक्ष्मी लाडेकर , सुनंदा दिवटे , बबली बिलोने , समर्थना देशभ्रतार, मिना कळंबे, सुषमा मस्के, वर्षा लोंढे, अनिता साकोरे, चंद्रगुप्ता पानतावणे, तुळजाबाई रामटेके, समिक्षा पाली, पौर्णिमा दुबे, जिजाबाई सोनुले, प्रतिक्षा चवरे, आकांशा वैकाडे, निशा ऊके, शालीनी बर्वे, सुनंदा बावने, गीता कळंबे, वनिता कात्यानी, राजु श्रीवास्तव, बबलु कमा ले, चंद्रहास पुरे, दिपनकर गजभिये, रवी महाकाळकर, विमोद किरपान, पंचम सलामे, आकाश वाढणकर, नारायण गजभिये, सौरभ पोटभरे, अविराम कनोजिया, आकाश कापसे सह आदि भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …