नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्या केल्याच्या निषेधार्थ आज येथे पोलिस विभागाच्या वतीने हुंकार रॅली काढण्यात आली.

या रॅलीत हजारो नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर
गडचिरोली- जिल्ह्यात नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्या केल्याच्या निषेधार्थ आज येथे पोलिस विभागाच्या वतीने हुंकार रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारो नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
नक्षल्यांनी आतापर्यंत ५३० निष्पाप नागरिकांची हत्या केली आहे. चालू आठवड्यात ३ जणांच्या हत्या केल्या असून, पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करण्याचे फर्मान सोडले आहे. या विरोधात आज शहरात हुंकार रॅली काढण्यात आली. नागरिकांनी हातात नक्षलविरोधी बॅनर धरुन नक्षल्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर क्रीडा भवन येथे मुख्य कार्यक्रम झाला. त्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी नक्षल्यांनी ठार केलेल्या ५३० नागरिकांचे स्मरण करीत नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याचे सांगितले. नागरिकांनी नक्षल्यांना गावबंदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी सुमारे पाचशे शालेय विद्यार्थ्यानी महात्मा गांधी यांची प्रतिकृती मानवी साखळीतून साकार करुन अहिंसेचा संदेश दिला.
Maharashtra News Media सच की आवाज