Breaking News

*नांदगाव जवळील पेंच नदी पात्रात बुडुन प्रविण ईवनाते चा मुत्यु* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल*

*नांदगाव जवळील पेंच नदी पात्रात बुडुन प्रविण ईवनाते चा मुत्यु*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १२ किमी अंतरावर असलेल्या नांदगाव जवळील पेंच नदी पात्रात प्रविण ईवनाते आघोंळ करतांना पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मृतक प्रविण रामभाऊ ईवनाते वय ४५ वर्ष राह. रिदोरा घोगदा ता. सौंसर जि. छींदवाडा, मध्यप्रदेश व मृतकाचे आई वडील भांडे रिपेयरिंग कामाकरिता दोन दिवस अगोदर पासुन नांदगाव येथे आले होते. सोमवार (दि.१३) जुन ला सकाळी ५ वाजता दरम्यान मृतक प्रविण रामभाऊ ईवनाते हा आंघोळ करायला पेंच नदी च्या पात्रात जातो म्हणुन गेला. परंतु परत न आल्याने वडील रामभाऊ मोबा ईवनाते वय ६५ वर्ष राह. रिदोरा घोगदा, मध्यप्रदेश यांना नांदगाव च्या लोकांनी सांगितले की, तुम्हचा मुलगा पाण्यात बुडुन मरण पावला. अश्या फिर्यादी रामभाऊ ईवनाते यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी पोस्टे ला मर्ग क्र. १७/२०२२ कलम १७४ जाफौ अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …