*नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्ग लगत गोट फार्म मध्ये गोर्वधन गोवंश सेवा अनुसंधान केंद्र पथकाची धाड*
*८५ गोरे गोवंशांना दिले जीवनदान*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोस्टे ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किमी अंतरावर असलेल्या नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील खंडाळा ओव्हरब्रिज जवळील सनप्लेग पशु डंम्पींग याड येथे गोर्वधन गोवंश सेवा अनुसंधान केंद्राच्या पथकाने धाड मारुन एकुण ८५ गोरे गोवंश पकडुन कन्हान पोस्टे ला फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून ८५ गोवंश गोऱ्यांना जीवनदान देऊन कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शुक्रवार (दि.१७) जुन ला सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वाजता दरम्यान गोर्वधन गोवंश सेवा अनुसंधान केंद्राच्या पथकाच्या आशा महेंद्र दवे वय ५३ वर्ष राह. बरडकिमी, भंडारा यांना गुप्त बातमी दाराकडुन माहिती मिळाली की, बारा चक्का ट्रक गाडी मध्ये गोवंश भरून नागपुर कडे येत आहे. अश्या विश्वसनीय माहिती वरून गोर्वधन गोवंश सेवा अनुसंधान केंद्राच्या आशा दवे आपल्या सह कर्मचारी सोबत कन्हान आउटर नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गावरील खंडाळा रेल्वे उडाण पुलाजवळ सनप्लेग पशु डंम्पींग याड (गोट फाॅर्म) जवळ येऊन पाहणी केली असता तेथे काळे, पांढरे व लाल रंगाचे एकुण ८५ गोरे गोवंश किंमत अंदाजे २,५५,००० हे कत्तली करिता नेण्यासाठी खरेदी करून आणुन जमा केले तसेच दोन बीमार गोवंश यांना विना वैद्यकीय उपचारा शिवाय ठेवल्याने पकडुन कन्हान पोस्टे ला फिर्यादी गोर्वधन गोवंश सेवा अनुसंधान केंद्रा च्या आशा महेंद्र दवे यांनी तोंडी तक्रारी दिल्याने व पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या लेखी आदेशाने आरोपी सुलतान वल्द निजाम खान यांच्या विरुद्ध अप क्र. ३६८/ २२ कलम ११९ म.पो.अधि.सह कलम ५ (ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम हे करीत आहे .
नागपुर बॉयपास चारपदरी महामार्ग रेल्वे उडाण पुला जवळ खंडाळा शिवारात एका शेतात तारेचे कुंपन करून काही टिनाचे शेड बनवुन येथे दररोज मध्यप्रदेशातुन दहा व बारा चाकी ट्रक मध्ये बोकुड, बकऱ्या निर्दयीपणे भरून आणुन येथे उतरवुन त्याच एका ट्रक च्या बकऱ्या दुसऱ्या दोन ट्रक मध्ये भरून नागपुर शहर व इतर पाठविल्या जाते. येथेच गोवंश सुध्दा पकडण्यात आल्याने कन्हान पोलीस मुंग गिळुन गप्प आहेत का ? अश्या नागरिकात चर्चा होत आहे .