*कन्हान येथे रोगनिदान व रक्तदान शिबीर कार्यक्रम थाटात संपन्न*
*युवा सेना कन्हान द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – युवासेना प्रमुख पर्यटन पर्यावरण व राज शिष्टाचार मंत्री मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात युवासेना व्दारे कन्हान ला रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करून कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
कन्हान-पिपरी नविन नगरपरिषद भवन येथे सोमवार (दि.१३) जुन ला युवासेना प्रमुख पर्यटन, पर्यावर ण व राज शिष्टाचार मंत्री मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात युवासेना कन्हान व्दारे रोगनिदान व रक्तदान शिबिराचे युवासेना जिल्हाप्रमुख श्री.शुभमजी नवले, नगराध्यक्षा नगरपरिषद कन्हान सौ.करूणाताई आष्टणकर, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, कन्हान थानेदार विलास काळे, दखने हायस्कुल मुख्याध्यापिका.विशाखा ठमके, धर्मराज प्राथमिक मुख्याध्यापक खिमेश बढिये सर, नगरसेविका मोनिकाताई पौनिकर आदी प्रमुख उपस्थित रोगनिदान व रक्तदान शिबिराची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी आयोजक युवासेना रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर, जिल्हा समन्वयक लखन यादव, राज तांङेकर, ग्रा प खंडाळा (गहुहिवरा) सरपंच विमलताई बोरकुटे, ग्रा प नांदगाव उपसरपंच सेवक ठाकरे , ग्रा पं ङुमरी सदस्य श्रीकांत ङेंगे , समाजसेवक गजराज देविया सर, शिक्षक यातिन पशीने सर, कला पथक संस्थेचे नंदु वंजारी सर, कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम व युवासैनिक बहु संख्येने उपस्थित होते. या शिबीराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .