Breaking News

*गाडेघाट शेत शिवारात बांधलेले कानपुरी गोऱ्हाची बिबट्याने केली शिकार* *परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , बिबट्याचा वन विभागाने योग्य बंदोबस्त करावे नागरिकांची मागणी*

*गाडेघाट शेत शिवारात बांधलेले कानपुरी गोऱ्हाची बिबट्याने केली शिकार*

*परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , बिबट्याचा वन विभागाने योग्य बंदोबस्त करावे नागरिकांची मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – शहरात पासुन काही अंतरावर असलेल्या ग्राम पंचायत जुनीकामठी अंतर्गत गाडेघाट चे शेतकरी अतुल खंते यांच्या शेतात बांधलेल्या कानपुरी गोऱ्यावर बिबट्याने मागुन हल्ला करित शिकार जागी ठार केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक व कर्मचारी पोहचुन पंचनामा करून पुढील कारवाई करिता अहवाल संबंधिताकडे पाठविल्याने ग्रामस्थ शेतकऱ्यांनी पिडीत पशु मालकास नुकसान भरपाई देण्याची तसेच या बिबट्याचा योग्य बंदोबस्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे.


रविवार (दि.१९) जुन ला रात्री शेतकरी अतुल मोहन खंते हे गाडेघाट शेतशिवारात आपल्या शेतात मोकळ्या जागेवर गायी व कानपुरी गोरा, गाय बांधुन घरी गेले होते. सोमवारी पहाटे सकाळी बिबट्याने कानपुरी गोऱ्या वर मागुन हल्ला करून शिकार केली. सोमवार (दि.२०) जुन ला सकाळी ९ वाजता दरम्यान अतुल खंते हे आपल्या शेतात जनावरांना चाऱ्या पाणी देण्याकरिता व शेती कामाकरिता शेतात आले असता कानपुरी गोरा मृत अवस्थेत दिसुन आल्याने त्यांनी सदर घटनेची माहिती वनरक्षक पटगोवारी श्रीकांत टेकाम यांना दिली. तर वनरक्षक यांनी आपले वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती दिल्याने घटनास्थळी वनरक्षक श्रीकांत टेकाम, वन परिक्षेत्र अधिकारी अशोक दिग्रसे आपल्या कर्मचाऱ्या सह पोहचुन पाहणी व तपासणी केली. १ वर्षाचा कानपुरी गोरा मृत आणि त्याला मागुन थोडे खाल्लेला दिसुन आले. तसेच गोराच्या मानेला वन्यप्राणीचे दातांचे निशाने स्पष्ट पणे आढळुन आले. जवळच असलेल्या जागेवर वन्य प्राणी बीबट यांच्या पंजाचे निशान स्पष्टपणे दिसुन आले. घटने बाबत पशुमालक अतुल खंते यास विचार पुस केली असता त्यांनी सांगितले की, रोज प्रमाणे मी माझे पाळीव जनावरे माझ्या शेतातील जागेवर बांधत असतो. सोमवार ला सकाळी ९ वाजता मी माझ्या शेतातील जनावरांना चारा पाणी व शेताची कामे करण्यासाठी आले असता माझा गोरा मृत व त्यास मागुन थोडे खाल्लेले दिसल्याने घटनेची माहिती श्री एस जे टेकाम पटगोवारी यांना फोन करून दिल्याने वनविभा गाचे अधिकारी व वन कर्मचारी हयांनी घटनास्थळी येऊन पाहणी व तपासणी करून घटनेचा अहवाल संबधितांना पाठवुन पुढील चौकशी करीत आहे . गाडेघाट रहिवासी व ग्रामपंचायत जुनी कामठी चे उपसरपंच राहुल ढोके, ग्रामपंचायत सदस्य भुषण इंगोले, शेतकरी पारस यादव सह गावकऱ्यांनी शेतकरी पशु मालक अतुल खंते हयांचा कानपुरी गोरा बिबटयाने शिकार करून ठार केल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी तसेच या वन्य प्राणी बिबट यामुळे परिसरातील गावात मागील सहा महिन्या पासुन अनेक प्राळीव जनावराची शिकार करित असुन सुध्दा वन विभागा व्दारे बिबटयास पकडुन दुर जंगलात नेऊन सोडण्यात आले नसल्याने परत या घटनेने गावकरी शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निमार्ण झाल्याने बिबट्याचा वन विभागाने योग्य बंदोबस्त करून शेतकऱ्यांना
संरक्षण देण्याची मागणी वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक दिग्रसे व वनरक्षक श्रीकांत टेकाम हयांच्या मार्फत वन विभाग आणि संबधितांना करण्यात आली आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …