*कन्हान येथे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा सत्कार कार्यक्रम थाटात संपन्न*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र समोरील ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा ठमके यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण शिक्षिका वर्षा सिंगाडे , नागपुर ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व शिक्षक मोतीराम रहाटे , मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , सुरेश भिवगडे , यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन , महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी इयत्ता बारावी धर्मराज जुनियर काॅलेज कांद्री कन्हान येथील जानव्ही भोंडे हिने ९०:३०% गुण प्राप्त करीत तालुक्यात प्रथम क्रमांक व सानिका मंगर हिने ८८:००% गुण प्राप्त करीत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला असुन भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथील वाणिज्य शाखेतुन आकांशा चकोले हिने ७८:३३% गुण प्राप्त करीत काॅलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला व कला शाखेतुन पलक मरसकोल्हे हिने ७६:८३% गुण प्राप्त करीत काॅलेज मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला . इयत्ता दहावी मध्ये बीकेसीपी शाळेतुन सुहासीनी शुक्ला हिने ९५:४०% गुण प्राप्त करीत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला असुन धर्मराज शाळेतुन आयुष सोनेकर ह्याने ९०% गुण प्राप्त करीत तालुक्यात दुसरा क्रमांक पटकाविला . बळीरामजी दखने हायस्कुल शाळेतुन अपेक्षा रंगारी हिने ९२:८०% गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला असुन सरस्वती न्यु इंग्लिश हायस्कुल शाळेतुन मयुरेश रेखाते ह्याने ९२:३०% गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला . पंडित जवाहरलाल नेहरू शाळेतुन दिव्यानी काकडे हिने ८५:४०% गुण प्राप्त करीत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला असुन आदर्श हायस्कुल कन्हान शाळेतुन काजल कामट हिने ७७:८०% गुण प्राप्त करीत शाळेत द्वितीय क्रमांक पटकाविला . अश्या सर्व विद्यार्थांना मान्यवरांचा व मंच पदाधिकार्यांचा हस्ते शील्ड , नोटबुक , पेन , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असुन मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देऊन कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांना , विद्यार्थांना , नागरिकांना अल्पोहार वितिरित करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
या प्रसंगी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज