Breaking News

*फुटपाथ दुकानदारांना , साप्ताहिक व गुजरी बाजरा ला सुरक्षित जागा देण्याची मागणी* *कन्हान शहर विकास मंच पदाधिकार्यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन*

*फुटपाथ दुकानदारांना , साप्ताहिक व गुजरी बाजरा ला सुरक्षित जागा देण्याची मागणी*

*कन्हान शहर विकास मंच पदाधिकार्यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान ग्रामपंचायत चे रूपांतर नगर परिषद मध्ये होऊन आठ वर्ष झाली असुन सुद्धा नगर परिषद प्रशासनाने फुटपाथ दुकानदारांना , साप्ताहीक बाजाराला आणि गुजरी भाजीपाला दुकानदारांना सुरक्षित जागा न दिल्याने आज ही फुटपाथ दुकाने , साप्ताहिक बाजार आणि गुजरी बाजर नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर लागत असल्याने अपघाताचे व अतीक्रमण चे प्रमाण वाढले असुन शहरात मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ फुटपाथ दुकानदारांना , साप्ताहिक व गुजरी बाजरा ला सुरक्षित जागा देण्याची मागणी केली आहे .


शहरातील ताससा चौक ते आंबेडकर चौक पर्यंत नागपुर – जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग च्या दोन्ही बाजुला फुटपाथा वर दिवसेन दिवस अतिक्रमण वाढुन गुजरी भाजीपाल्याची दुकाने , फळाचे , गुपचुप चे हातटेले आणि विविध प्रकारची दुकाने आणि वाहने महामर्गा वरच लागत असून पार्किंग ची जागा नसल्याने स्टेट बैंक येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना महामार्गा वाहन उभी करावी लागत असल्याने चारपदरी महामार्ग ऐकेरी दोन वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असुन दररोज छोटे मोठे अपघात होऊन निदोर्ष नागरिक वेळे प्रसंगी जख्मी , व अपंगत्व आणि मृत्युस बळी पडावे लागत आहे . मागील दोन महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यात पाच तारखेला अशोक खंडेलवाल यांच्या महामार्गा वरील स्टेट बैंक समोर अपघातात मृत्यु झाला अऊन या जुन महिण्यात १४ ला मुशरिफ अंसारी यांच्या स्ट्रेट बैंक समोर आपघात झाला असुन त्याचा उपचार कामठी येथील खाजगी रुग्णालयात सुरु आहे .
तसेच दर शुक्रवार ला भरत असलेला साप्ताहिक बाजार हा राष्ट्रीय महामार्ग वर भरत असल्याने वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असुन रोजचा गुजरी बाजार हा तारसा चौक ते स्ट्रेंट बँक पर्यंत आणि आंबेडकर चौक येथुन पिपरी कडे जाणाच्या महामार्गावर लागत असल्याने दररोज छोटे – मोठे अपघात होत असुन सुद्धा नगर परिषद प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय ? असा प्रश्न निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी राजेंन्द्र चिखलखुदे यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ फुटपाथ दुकानदारांना , साप्ताहिक बाजाराला आणि गुजरी बाजाराला सुरक्षित जागा उपलब्ध करून शहरातील महामार्गा वर होत असलेले अपघाताचे प्रमाणा आडा घालण्यात यावा आणि ट्राफीक नियंत्रणात करुन महामार्ग मोकळे करावे . अशी मागणी केली आहे .
या प्रसंगी कहान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , प्रवीण हुड , वैभव थोरात , हरीओम प्रकाश नारायण , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …