*धर्मराज विद्यालय कान्द्री कन्हान च्या १० वीत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – माध्यमिक शालांत परिक्षा मार्च २०२२ च्या घोषित निकालात धर्मराज विद्यालयातुन प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्याचा धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान व्दारे सत्कार करून विद्यार्थ्यांचा उत्साह व्दिगुणीत करण्यात आला.
धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान या शाळेतुन १७३ पैकी १६७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा ९७.०९ % निकाल लागला. यात प्रथम आयुष संजय सोनेकर ९० %, व्दितीय कु. एकता तुषार मुरकुटे ८९% , तृतीय कु. खुशी पुरुषोत्तम दहेकर ८७.२० %, कु. श्रेया सुनील घोडेस्वार ८७.२० %, कु. दिव्याणी दिलीप ढोले ८४. ८० %, कु. मानसी मोरेश्वर ठाकरे ८३.८० %, कु. खुशी सुरेश टेंभुणे ८२.८० %, कु. साक्षी तुळशीराम पाहुणे ८१.६० %, कु.अंजु सुरेश वाटकर ८१ %, कु.आकांक्षा महेश बिसने ८०.६०% गुण प्राप्त करून उत्तीर्ण होत शाळेतुन प्राविण्य प्राप्त केल्याने धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.रमेश साखरकर सर व शिक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील यशाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक सुनील लाडेकर, अनिल सारवे, हरीश केवटे, विलास दखोळे, अनिल मंगर, अनिरुद्द जोशी, विजय पारधी, अशोक राठोड, शंकर साखरकर, सतीश राऊत, दिनेश ढगे, उदय भस्मे, गणेश चिंचुलकर शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज