*मोठी बातमी*
*साळावा शिवार येथे जंगलात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन एका आरोपी ने केली हत्या , आरोपी अटक*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन मौदा पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
मौदा – मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत साळावा शिवार येथे जंगलात आरोपी धीरज शेंडे ह्याने अल्पवयीन मुली ला बळजबरीने मोटार सायकल वर बसवुन मिला जंगलात नेऊन तिच्या वर लैंगिक अत्याचार करुन चाकु ने गळ्यावर आणि पोटावर सपासप वार करुन तिची हत्या करण्यात आल्याने मौदा पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी धीरज शेंडे ह्याला अटक करुन त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार दिनांक २१ जुन ला सकाळ ते दुपार च्या दरम्यान अल्पवयीन मुलगी ही ट्युशन क्लास वरुन घरी परत येत असतांना आरोपी धीरज सुरेश शेंडे वय १९ वर्ष राहणार भामेवाडा , मौदा ह्याने अल्पवयीन मुली ला बळजबरीने मोटार सायकल वर बसवुन मिला जंगलात नेऊन तिच्या वर सायंकाळी ४:०० वाजता च्या दरम्यान लैंगिक अत्याचार करुन चाकु ने गळ्यावर आणि पोटावर सपासप वार करुन तिची हत्या करुन पुरावे नष्ट करण्याचा उद्देशाने आरोपी धीरज शेंडे ह्याने तिचा मृतदेह जंगलात फेकुन देत गावाच्या दिशेने पळ काढला .
सदर प्रकरण बुधवार दिनांक २२ जुन ला उघडकीस आल्याने परिसरात एकच खळखळ उडाल्याने मौदा पोलीसांनी आरोपी धीरज सुरेश शेंडे ह्याला अटक करुन पुढील तपास करीत आरोपी ला विचारपुस केली असता त्याने सांगितले कि अल्पवयीन मुलगी ही १५ वर्षीय असून ती शिवाजीनगर मौदा येथे राहत होती आणि शहरातील जनता हायस्कुल मध्ये इयत्ता दहाव्या वर्गात तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याची माहिती आरोपी धीरज शेंडे ह्याने पोलिसांना दिली. ह्याच संशयापोटी आरोपी धीरज शेंडे ह्याने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून साळवा शिवारात जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन व भांडण करीत चाकु ने गळ्यावर आणि पोटावर वार करून तिची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी धीरज ने तिचा मृतदेह जंगलात फेकून देत गावाच्या दिशेने पळ काढला होता .
सदर प्रकरणा बाबत मौदा पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी धीरज सुरेश शेंडे ह्याचा विरुद्ध विविध कलमा ने गुन्हा दाखल करून पुढील तपास मौदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेंमत कुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात मौदा पोलीस करीत आहे .