Breaking News

*ना जि म सहकारी बैंक कोंढाळी तर्फे 94% पीक कर्ज वाटप* *लक्षांक पुर्ती लवकरच*

*ना जि म सहकारी बैंक कोंढाळी तर्फे 94% पीक कर्ज वाटप*

*लक्षांक पुर्ती लवकरच*

कोंढाळी वार्ताहर
नागपुर – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा कोंढाळी यांचे मार्फत खरिफ पिक हंगाम वर्ष 2022-2023 करिता पिक कर्ज वाटपात आता पर्यंत 94टक्के लक्षांक पुर्ण केले आहे।तर या सहकारी बैंकेला दिलेले लक्षांक लवकरच पुर्ण करण्यात येईल अशी माहिती शाखा निरिक्षक राधेश्याम नरोलिया यांनी दिली आहे।
या प्रसंगी बैंक निरिक्षकांनी सांगितले की कोंढाळी शाखेतून 146शेतकर्यांना एक कोटी 94लाखाचे कर्ज वाटप केले असून मध्य मुदती दुग्ध व्यवसायाकरिता एक सभासद एक लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे। तसेच ना डि से को मार्फत चारचाकी, दोन चाकी, शेतीउपयोक्त व शेतकरी व्यवसाय निगडीत आकर्षक कर्ज योजना, गोल्ड लोन, गृहकर्ज, पाल्यांकरिता शैक्षणिक कर्ज, तसेच व्यक्तिगत कर्ज योजना राबविण्यात येत असलेल्याची ही माहीती निरिक्षक राधेश्याम नरोलिया यांनी दिली आहे।

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …