Breaking News

*कन्हान ते रामटेक बंडखोर आमदारांचा निषेध* *गांधी चौक रामटेक येथे निषेध सभा संपन्न झाली*

*कन्हान ते रामटेक बंडखोर आमदारांचा निषेध*

*गांधी चौक रामटेक येथे निषेध सभा संपन्न झाली*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – महाविकास आघाडी सरकार मधले शिवसेने चे काही बंडखोर आमदार गुवाहटीत गेल्याने ठाकरे सरकार ची डोकेदुखी वाढली असुन या बंडखोर आमदारा मध्ये रामटेक विधानसभा क्षेत्राचे अपक्ष निवडुन आलेले आमदार आशिष जैस्वाल यांनी ठाकरे सरकार ला समर्थन केले होते . परंतु राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी आमदारां च्या मागण्या पुर्ण न केल्याने एकनाथ शिंदे सह ३० पेक्षा जास्त आमदार गुवाहाटीत गेल्याने ठाकरे सरकार अडचणीत आली आहे .

या बंडखोर आमदारा मध्ये रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या समावेश असल्याने याचा जाहिर निषेधार्थ 27 जून रोजी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात कन्हान शिवाजी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत ते रामटेक गांधी चौकात पर्यंत निषेध बाईक रैली काढुन दुपारी एक वाजता निषेध सभा घेण्यात आली. यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव म्हणाले की, आमदार आशिष जैस्वाल हे शिवसेनेच्या नावावर तीन वेळा निवडून आले. पक्षामुळे तो मोठा झाला. मात्र शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत पक्षाचा विश्वासघात केला आहे. शिवसैनिक त्यांना विसरणार नाहीत. याची किंमत त्याला येत्या निवडणुकीत चुकवावी लागेल. त्यांच्या विरोधात संपूर्ण रामटेक विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकात रोष आहे. हा आता गल्ली ते संपुर्ण क्षेत्रात पाहायला दिसेल. शिवसेना पक्षाने जैस्वाल यांना खनिज महामंडळाचे अध्यक्ष केले. तरी सुध्दा बंडखोरा सोबत गुवाहाटी ला पोहचले. आणि गद्दार झाल्याने आता गद्दाराला माफी नाही. यावेळी रामटेक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवुन आंदोलन दाबण्याचा पर्यंत पोलीसांनी रामटेक बस स्टाप वर शिवसैनिकाना अडवुन केला होता. शिवसैनिक रसत्यावर उतरल्यास कोणीही अडवु शकत नाही हे आज दाखवुन दिले. रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पोलिसांचा चोख कडक बंदोबस्त ठेवला होता. बसस्थानकावरून पायदळ रॅली काढुन शेवटची सभा गांधी चौकात घेऊन निशेष नोंदविला.
या प्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …