*कन्हान नदीत एका तरुणांचा बुडून मृत्यू*
सावनेर – पाटणसावंगी नजिकच्या वाकी येथील कन्हान नदीत एका तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली ; वृषभ दिनेश चांदेकर वय 22 रा. पाठणकर चौक, अंगुलीमाल नगर, नागपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी असलेले सहा ते सात युवक पिकनिकसाठी सावनेर तालुक्यातील वाकी येथे आज आले., येथे पोहोचल्यानंतर सर्वांचा आजूबाजूचा परिसर फिरण्याचा मोह झाला. त्यामुळे त्यांनी परिसरात असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचा बेत आखला. सर्व तरुण कन्हान नदी पात्राजवळ गेले. नदी काठावरचे कमी पाणी पाहून त्यापैकी वृषभ चांदेकर व नयन रामटेके ह्या दोन तरुणांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. मात्र, या युवकांना पाणी किती खोल आहे याचा अंदाज आला नाही. पाण्यात उतरताच ते दोन तरुण बुडू लागले. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात
नयन रामटेके, नागपूर यालाच वाचविण्यात यश आले. व वृषभ चांदेकर डोहात बुडला गेला. घटनेची माहिती खापा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने पाण्यात शोध कार्य घेत वृषभ चा मृतदेह काढण्यात आला.
पर्यटक फलकाकडे दुर्लक्ष करतात –
वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोल डोह आहे. या डोहात आजवर शेकडोंचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. याची माहिती देणारे सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. मात्र, येथे येणाऱ्या युवकांना पोहण्याचा मोह आवरत नसल्याने फलकाकडे दुर्लक्ष करतात.
Maharashtra News Media सच की आवाज