*अवाढव्य मालमत्ता कर वाढीने मोडले नगरवासीयांचे कंबरडे़*
*नवीन मालमत्ता कर वाढीसह शिक्षण, वु्क्ष,पर्यावरण, अग्नीशमन सारख्या उपकरात ही भरमसाठ वाढ*
*आक्षेप नोंदविन्या आधी मागील पुर्ण अथवा नवीन 30 टक्के कर भरण्याची अट*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले व्दारा*
*सावनेरःसावनेर नगर पालिका या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेचा विषय असतो यावेळी चर्चेचा विषय आहे तो नव्याने झालेला “चतुर्थ वार्षिक कर मुल्यांकन” या कर मुल्यांकनात नगरवासियांच्या मालमत्ता करात झालेल्या अवाढव्य करवाढी मुळे नगरवासियांचे अक्षरशः कंबरडेच मोडल्याचे चीत्र दिसून येत आहे*
*सन 2019 ते 2023पर्यंतच्या या मालमत्ता मुल्यांकनात अक्षरशः कई पटीने मालमत्ता कर वाढ झाल्याने नागरिकांत असंतोष खदखदत असेन नगरितील जवळपास 4800 मालमत्ता धारकांना याचा फटका बसत आहे.इतकेच नव्हे तर सदर वाढीव मालमत्ता मुल्यांकनात ज्या गोर गरिबांनी पंतप्रधान आवास योजनेत आपल्या कवलारु घरां ऐवजी सीमेंटच्या छताचे मकान बांधले त्या घरांना ही या अंड़ संड़ वाढीव मालमत्ता वु्ध्दीच्या भुताने झपाटल्याचे वु्त्त आहे.*
*स्थानिक नगर प्रशासन व अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांचे नुसार जूने मालमत्ता धारकांना दहा ते पंधरा टक्क्यांनी व नवीन मालमत्ता धारकांना नवीन नियमानुसार आकारणी केल्याचे बोलल्या जात आहे.व वाढीव मालमत्ता देयकाच्या विरोधात आक्षेप नोंदवा नंतर पाहू चा सूर लावल्या जात आहे.जर आपणास वाढीव मालमत्ता देयकाच्या विरोधात आक्षेप नोंदवायचा असेल तर त्या करीता जूना मालमत्ता कर भरल्याची पवती,अथवा नविन कर आकरणीतील तीस टक्के रक्कम,आक्षेपकर्त्याचे आधारकार्ड,नोटीसाची पावती सोबत नवीन कर आकारणीचे देयक इत्यादी कागदपत्रे सादर करणारेच सुनावणीस पात्र राहतील अशी तंबी देत नगर प्रशासनाची तिजोरी भरल्या जात असल्याचे उघड़ चित्र आहे*
*जुन्या घराला रंग रोगट़ी करणे भोवले*
*नगरितील गोर गरीब मालमत्ता धारकानां आपल्या वडीलोपार्जीत घराला रंग रोगटी करणे भोवल्याचे ही अनेक प्रकरण पुढे येत आहे अश्याच एका मालमत्ता धारकाने आपल्या जुन्या घराला असलेल्या पंढर्या चुन्या ऐवजी डिस्टेभर व बाहेरील आवारास थोडी देखनी रंग रोगटी केल्याने त्याचे नवीन मालमत्ता देयक 430/- रुपया वरुण चक्क 7373/- रपये अशी जवळपास वीस पटीने वाढ करत बिचार्यास दिवसाच तारे दाखवीले असे अनेक मालमत्ता धारकांच्या नवीन मालमत्ता देयकात भरमसाठ वाढ झायाने नगरीतील सर्व मालमत्ता धारक चिंतातूर झाले असून या झपाटलेल्या वाढीव मालमत्ता कर संकटात त्याच्या पाठीशी कोणताही जनप्रतिनीधी अथवा संघटना पुढाकार घेत नसल्याने स्वताला या संकाटत एकटाच व हतबल असल्याचा भास सर्व मालमत्ता धारकांच्या चेहर्यावर दिसून येत आहे.सदर विषयाला धरून कोण पुढाकार घेणार…?वाढीव अवाढव्य मालमत्ता देयक कमी होणार की नाही…?असे प्रश्न निर्माण होत आहे*
*उपकर वढीने केले आगीत तेल ओतण्याचे काम*
*वाढीव नवीन मालमत्ता कर आकारणीत राहली सुहली कसर पुर्ण करत “आगीत तेल ओतन्याचे कार्य” शिक्षण कर,वु्क्ष कर,पर्यावरण कर,अग्निशमन कर,उपभोक्ता कर सारख्या उपकराने केले आहे यावर नगरीत कधी वु्क्षारोपन झाले,कीती झाडे लावली त्यातून कीती झाडे जगली,किती झाडांचे संगोपन नगर प्रशासनाने केले,नगर प्रशासनाच्या सेवत असलेला पांढरा हत्ती म्हणजेच “अग्निशमन बंब”याचा कीती आग विझवन्याकरिता उपयोग झाला,नगरीचे पर्यावरण राखण्यासाठी काय व कोणत्या उपाय योजना राबविण्यात आल्या अथवा येणार,आज पर्यंत शहरातील पर्यावरणात कीती सुधार झाला,उपभोक्ता कर म्हणजे काय…?त्याचा सामान्य नगर वासियांना काय लाभ मिळाला अथवा मिळणार याची आकडेवारी व होणारा खर्च याचा हिशोब सर्व बराबर असे जनसामान्य व जानकारांचे मत आहे.नगर प्रशासनाव्दारे झालेल्या या भरमसाठ मालमत्ता कर वाढीचा सर्वच स्तरावर विरोध होत असुन सदर विषयाच्या विरोधात नगरवासीयांत संतप्त संतापाची लाट असून याचा उद्रेक होणे ही नाकारता येत नाही. वाढीव नवीन मालमत्ता कर आकारणीमुळे त्रस्त व नाराज नगरवासीयांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता नक्कीच नगर प्रशासनास घाम फुटनार असल्याचे एकूण चीत्र आहे*