*बडनेरा ते नागपूर रेल्वे मोवाड मार्गने सुरू करावी*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
बडनेरा – पासून ते नागपूर व नागपूर ते बडनेरा पर्यंत अनेक मोठे शहर आहेत .ज्या विकास हा मुळ रेल्वे मार्मने होऊ शकतो .बडनेरा, अमरावती, चांदुर रेल्वे, मोशी, हिवरखेड,वरुड,पुसला, मोवाड ,नरखेड, काटोल, कळमेश्वर, अशा अनेक शहराची लोकसंख्या ही काही ची १५ हजार, काही ची २० हजार च्या वर म्हणजे सरासरी विचार केला तर १० लाखाच्या वर अनेक शहरा मिळीन व छोट्या छोट्या गावाची यामुळे अनेक रेल्वे प्रवासी हे आहे ज्यांना नियमित नागपूर ला कोणी सरकारी कामासाठी, विद्यार्थी शैक्षणिक काम व शिक्षण घेण्यासाठी, काही खाजगी नोकरी साठी व काही लोक हे आजार पण वर औषध घेण्यासाठी जातात. शेतकरी यांना आपल्या शेतातील माल विकणे साठी जावे लागतात असे एक नाही अनेक कामे घेऊन हे नागपूर शहर उपराजधानी चे शहर असले मुळे जातात .बसच्या प्रवास हा दिवसन दिवस महाग होत आहे .हा सर्व सामान्य लोकांना परवडत नाही .यासाठी या र्मागने रेल्वे गाडी सुरू करणे ची मागणी सर्व शहरातील लोक करत आहेत.ही मागणी लवकर लवकर पुर्ण कराणेत यावी.