*कन्हान ला भाजपा द्वारे विजय जल्लोष साजरा*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्यात भाजपा समर्थित शिंदे सरकार स्थापित झाल्याने कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका व शहर पदाधिकार्यांनी तारसा चौक येथे विजय जल्लोष साजरा केला .
गेल्या काही दिवसान पासुन राज्यात सुरु असलेल्या राजकीय बंडामध्ये उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिंदे गटाला समर्थन देऊन राज्यात भाजपा समर्थित शिंदे सरकार स्थापित झाली असुन एकनाथजी शिंदे यांची मुख्यमंत्री पदी व देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर कन्हान तारसा चौक येथे भाजपा पारशिवनी तालुका व शहर पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फटाक्यांची आतिषबाजी करुन डीजेच्या तालावर गुलाल उधळुन , एकमेकांना मिठाई घालुन विजयी जल्लोष साजरा केला .
या प्रसंगी भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा ओबीसी आघाडी नागपूर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक , भाजपा ग्रामविकास आघाडीस अध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे , नगरपरिषद गटनेते राजेंद्र शेंदरे , कामेश्वर शर्मा , अमोल साकोरे , सुनिल लाडेकर , नगरसेविका सुषमा चोपकर , अनिता पाटील , संगीता खोब्रागडे , वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , शहर महिला आघाडी अध्यक्ष तुलेषा नानवटकर , सुषमा मस्के ,प्रतीक्षा चवरे , मीना कळंबे , सुनंदा दिवटे , स्वाती पाठक , शैलेश शेळके , संजय रंगारी , अमोल साकोरे ,सौरभ पोटभरे , संकेत चकोले , मनोज कुरडकर , अजय लोंढे , सचिन वासनिक , मयूर माटे , सचिन कांबळे , आकाश वाढणकर , रोहित चकोले , ऋषभ बावनकर , पारस यादव , विक्रांत सोलंकी , रंजित शिंदेकर , रवी महाकाळकर , विनोद किरपान , दिपचंद शेंडे , महेंद्र चव्हाण , सुरेश कळंबे सह आदि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .