*किचन रॅक मंध्ये निघाला “विषारी कोब्रा”*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असुन केव्हा व कुठे विषारी जिवजंतूचा सामना होईल सांगता येत नाही अश्यात सतर्कता हाच सोपा मार्ग असुन अंधारात,झाडी झुडपीत जाने,दगडविटा उचलठेव करतांना सावधगिरी बागळगने अत्यंत गरजेचे आहे*
*असाच एक प्रकार सावनेर शहरातील जैस्वाल लेआउट मधे उघडकीस आला चक्क अतीविषारी कोब्रा प्रजातीच्या नागोबाने स्वयंपाक खोलीत असलेल्या भांडीकुंडी ठेवण्याच्या रँकम मधे ठान मांडले.सर्पमित्र अजय पटेल व सहकारींच्या मदतीने नागोबाला पकडल्यावर घरातील मंडळीने सुटकेचा श्वास घेतला*
*तर सर्प हा मनुष्याचा क्षत्रू नव्हे तर मित्र आहे. सापाच्या भारतात जवळपास 278 जाती आढळतात यात 15 टक्के सर्प विषारी आढळतात*
*सापाचे मुख्य खाद्य उंदीर आहे आणि त्यांच्यावर नैसर्गिक नियंत्रण ठेवण्यास कार्य साप करतात, जवळ-जवळ 26% धान्याचे उंदीर नसाडे करतात. सर्प उंदीरला खाऊन धान्य सुरक्षित ठेवण्याचे कार्य करतात. त्यामुळे सर्प हा मानवाचा मित्र आहे सर्प हा पर्यावरण रक्षणाचा मुख्य घटक आहे*
*दि.4 जुलै रोजी सुमारे सकाळी 9.30 च्या दरम्यान सुरेश हजारें राहणार जैस्वाल लेआऊट मंध्ये यांच्या घरी किचन मधील भांड्याच्या रॅक मंध्ये 4 फुट लांब कोब्रा प्रजातीचा साप आढळला असता त्यांनी सर्पमित्र अजय पटेल यांना संपर्क केला व त्यांनी वा त्यांचे सहयोगी यांच्या साहाय्याने तेथील सापाला सुरक्षित प्लास्टिकच्या जार मंध्ये बंद करून सुरक्षित जंगलात सोडण्यात आले.*
*सर्पमित्र घनश्याम तुर्के यांच्याकडून सर्पदंश अथवा तत्सम प्रकार टाळण्यासाठी कांही महत्वाच्या सूचना नागरिकांना देण्यात येत आहे*
*घराच्या आजूबाजूस दगडाचे, विटाचे ढिगारे लाकडाचे कच्याचे अनावश्यक ढीग साचू देऊ नका,खिडकी जवळ झाडे वेली वाढू देऊ नका,साप दिसल्यास मारण्याचा व पकडण्याचा प्रयन्त करू नका.,सर्पदंश झाल्यास घरगुती उपचार व झाडफुक न करता दवाखान्यात जावे.साप आढळून आल्यास तज्ञ सर्पमित्र घनश्याम तुर्के,अजय पटेल,मोहित बारस्कर,सुरज ताभाने,संकेत गमे,अक्षय आवारी,हर्ष बिलवार,शेखर घ्यार आदींशी संपर्क करण्यचे आव्हान केले आहे*