Breaking News

*आदर्श हायस्कुल कन्हान येथे प्रवेशोत्सव साजरा* *विद्यार्थांचा पाठ्यपुस्तक, गणवेश वितरण करून केला सत्कार*

*आदर्श हायस्कुल कन्हान येथे प्रवेशोत्सव साजरा*

*विद्यार्थांचा पाठ्यपुस्तक, गणवेश वितरण करून केला सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – शासनाच्या आदेशा नुसार बुधवार पासुन सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी आदर्श हाय स्कुल कन्हान येथे विद्यार्थांना पाठ्यपुस्तक, गणवेश व मिठाई वितरण करून सत्कार करीत प्रवेशोत्सव साज रा करण्यात आला.


बुधवार (दि.२९) जुन ला परिसरात इयत्ता १ ते १० पर्यंत शाळा सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी आदर्श हायस्कुल व आयडियल कांव्हेट हिंदी प्राथमि क शाळा कन्हान येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोज न करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष हायस्कु ल च्या मुख्याध्यापिका श्रीमती सी एन मेश्राम, प्रमुख पाहुणे प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता देशमुख, संस्था सचिव भरत सावळे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थांना पाठ्यपुस्तक, गणवेश व मिठाई वितरण करून सत्कार करीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …