Breaking News

*निलज ग्रामपंचायत येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष रित्या करुन दोषीयांवर कारवाई करण्याची मागणी* *राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन*

*निलज ग्रामपंचायत येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष रित्या करुन दोषीयांवर कारवाई करण्याची मागणी*

*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण पदाधिकार्यांचे तहसीलदारांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवणी तालुक्यातील निलज ग्रामपंचायत येथील निवडणुक आरक्षण प्रक्रिया निष्पक्ष रित्या करुन दोषीयांवर कारवाई करण्याची मागणी करिता राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण पदाधिकार्यांनी जिल्हा उपाध्यक्ष चंन्द्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे .
ग्रामपंचायत निलज ची एकुण वोटिंग संख्या १५३८ आहे . सदर वोटिंग संख्येत एन टी वर्गाचे मतदान ७०० नागरिकांच्या घरात आहे . अनुसूचित जाती चे ३१ व अनुसूचित जमाती ३२ वोटिंग धारक आहे . वोटिंग अल्प प्रमाणात असला तरी त्याचा कुटुंब 100 च्या घरात आहे . ज्यामुळे प्रशासनाने अशा घटकांना गृहीत धरून आरक्षण काढणे अनिवार्य आहे . मात्र येथे अनुसूचित जाती व अनुसुचित जमातीच्या लोकांना समजुन आरक्षण काढण्यात आले आहे . ज्यात ग्राम पंचायत सदस्य चे ९ सदस्य सर्वसाधारण आरक्षित व त्यातूनच ५ महिला सर्वसाधारण वर्गातून आरक्षित करण्यात आल्याने अल्प संख्यात जातीच्या घटकांकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करण्यात आले आहे . ग्राम पंचायत अस्तित्वात आल्यापासून स्वराज्य पंथ संस्था अस्तित्वात आल्यापासून इथे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती साठी आरक्षण सोडण्यात आले नाही . तर या अगोदर आरक्षण सोडत मध्ये अधिकाऱ्यांनी जनतेतून सरपंच निवडणुक च्या शासनाच्या आदेशानुसार येथे अनुसूचित जाती साठी सरपंच पद प्रक्रिये नुसार आरक्षित केले होते . मात्र तिथे ही जाणीवपूर्वक षडयंत्र करण्यात आले . सदर प्रकार हा अतिशय निंदनीय असला तरी या मागचे कारण काय ? तरी समोर होणाऱ्या निवडणुकीत आरक्षण प्रक्रिया द्वेष भावनेतून न करता निष्पक्ष रित्या करण्यात यावी . संविधानात तरतुद प्रमाणे रोस्टर पद्धतीने सर्व दुर्बळ घटकांनाचा राजकीय विकास व्हावा कायद्यात तरतूद असतांना हेतुपरस्पर डावलणे जातीय विषमता वाढवण्याची प्रमुख भूमिका प्रशासन व नुवडणूक अधिकारीच घेत आहे . या संदर्भात महाराष्ट्र चे मुख्य चुनाव अधिकारी यांना ही या बाबद माहिती दिली आहे . ज्या निर्णय अधिकारी ने हेतुपरस्पर सदर षडयंत्र केले त्यावर अॅट्रोसिटी चा गुन्हा दाखल करून सत्काळ भुलक्षी प्रवाहाने निलंबित करण्यात यावे व समोर होऊ घातलेल्या निवडणुकी मध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या प्रवर्गातून आरक्षण काढण्यात यावे . जेणे करून समाजात एकता अघता कि प्रतीक जिवंत राहतील अन्यथा जातीय दंगल होणार त्या मागचे सूत्रधार प्रशासकीय अधिकारीच असेल असे दक्षता घ्यावी . अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामीण पदाधिकार्यांनी जिल्हा उपाध्यक्ष चंन्द्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन केली आहे .
या प्रसंगी रवींद्र दुपारे , विठ्ठल वाघधरे , सतपाल चकोले , सुनिल डोंगरे , सचिन दुपारे , रोहित मानवटकर , क्रिष्णा शेंदुरकर , अशोक मुंगाटे , मुरलीधर गोलछेडवार , गंगाधर डोंगरे , अमोल दुपारे सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …