Breaking News

*कन्हान येथे उद्या भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन* *जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे आयोजकांचे नागरिकांना आव्हान*

*कन्हान येथे उद्या भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन*

*जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे आयोजकांचे नागरिकांना आव्हान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनसंघ व शिक्षाविद्, चिन्तक चे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२१ व्या जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद इमारत येथे करण्यात आले आहे .


या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत सांगडे , पोलीस निरीक्षक विलास काळे , नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते होणार आहे . या भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमात शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करुन कार्यक्रमाला सहकार्य करावे असे आव्हाहन आयोजकांनी केले आहे .


या क्रार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे कोषाध्यक्ष महेश शेंडे , प्रवीण हुड , आदि मंच पदाधिकारी सहकार्य करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …