*जेष्ठ नागरीक मंडळ नरखेड तालुका सभा संपन्न*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड – पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक जयपालसिंह गिरासे नरखेड यांच्या प्रमुख ऊपस्थिती मध्ये ,शरद मेंगळ प्राध्यपक यांच्या अध्यक्षते मध्ये ज्ञानेश्वर टेकाडे , मंडळ तालुका सचिव विजय घाडगे ,पोलिस पाटील समूह नागपूर विभाग अध्यक्ष यांच्या ऊपस्थिती मध्ये .
वरील मान्यवरांचे स्वागत केले.
दिनांक 02/07/2022 शनिवारला सकाळी 11 वाजता पोलिस्टेशन नरखेड,
मृत आत्म्यानां शांती सद् गती मिळोत म्हणून मौन व शांतीपाठाने सुरवात झाली.
मार्गदर्शन करतांना ठाणेदार साहेब म्हणाले जेष्ठानी हेकेखोर पणाने मी म्हणतो असेच नाही सहजतेने जगावे परिवाराने सल्ला मागीतलातरच द्यावा आग्रह धरुनयेत मी म्हणतो म्हणून चा हेका बाजूला ठेवावा.
आपले जीवन सुखकर जगतायेईल असे नियोजन करावे घराबाहेर पण वेळ घालवावा खेळणे,व्यायाम ,विनोद करणे हसणे
काही समस्या असल्यास मंडळ वा आमच्यापर्यंत आल्यात तर आम्ही सहयोगी आहोतच असे सुंदर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष , मेंगळ सर म्हणाले आत्ता पोलीसची भीती अगोदर सारखी राहली नाही आपण आपल्या समस्या सहजतेने मांडून सोडऊन घेऊ शकतो साहेब मनमिळाऊ व तत्पर आहेत असे उद्गार काढले.
,टेकाडे मंडळ सचिव प्रस्ताविक करतांना मंडळाची वाटचाल स्वर्गीय वाडकर गुरुजींची आठवन कर ऊजाळा दिला ,जेष्ठांचे परीचयपत्र वर चर्चा झाली ते होणार असे व मंडळाच्या वाटचालीवर माहिती दिली.
घाडगे पोलीस पाटलांनी जेष्ठांचे शब्द सुमनाने स्वागत करून सहयोग देन्याचे व संगठन महिला व सर्व समावेशक करण्याचा सल्ला दिला.
बैठकीचे आयोजन पुलिसस्टेशन चे होते
व्यावस्थापण , मिलिंद राठोड यांनी केले.
नरखेड,बेलोना, तिनखेडा माणिकवाडा,दळवी मोहदी सह इतर गावातील जेष्ठ मंडळी ऊपस्थित होती .संचालन व आभार प्रदर्शन पुरुषोत्तम थोटे संघटन सचिव तालुका यांनी केले
जेष्ठनागरिकांची कुठलीही समस्या
असेल स्वतः कडून सुटत नसेल तर लेखी स्वरूपात मंडळाला द्यावी असे आव्हान संगठन सचिव यांनी या वेळी केले कार्यक्षेत्र नरखेड