Breaking News

*कन्हान ला १५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती थाटात साजरी* *कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला १५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांची १२१ वी जयंती थाटात साजरी*

*कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय जनसंघ व शिक्षाविद्, चिन्तक चे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२१ व्या जयंती निमित्य भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे आयोजन कन्हान – पिपरी नगर परिषद नवीन इमारत येथे करण्यात आले.

असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , नेहरु युवा केंद्र नागपुर चे उद्यविर सिंग , डॉ रवि गजभिए , मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . त्यानंतर लाईफ लाईन हाॅस्पीटल ब्लड बॅंक चे पथक डॉ अविनाश बाभरे , रवि गजभिए , पायल सागरे , प्रियंका ठोमरे , दिव्या हेडाऊ, वैभव लोहकरे , विशाल घोडेस्वार यांच्या सहकार्याने एकुण १५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असता रक्तदात्यांना टिफीन बाॅस , फळ , निंबु शरबत व नमकीन पॅकिट वितरित करुन सत्कार करीत कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , सुधिर भिवगडे , निलेश गाढवे , केतन भिवगडे , श्याम मस्के , प्रवीण हुड , अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , हरीओम प्रकाश नारायण , सह आदि मंच पदाधिकार्यांनी , सदस्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …