Breaking News

*प्रेमी युगलाची मॅंगनिज खदानीच्या डोहात आत्महत्या* *९ जून पासून दोघेही होते बेपत्ता* *मृतक दोघांचेही दिर-वहीणीचे नाते*

*प्रेमी युगलाची मॅंगनिज खदानीच्या डोहात आत्महत्या*

*९ जून पासून दोघेही होते बेपत्ता*

*मृतक दोघांचेही दिर-वहीणीचे नाते*

रामटेक – दिर व वहिणीचे नाते असलेल्या प्रेमी युगलानी दि ६ जुलै २०२२ ला खदाणीच्या डाेहात उडी मारुन आपली जीवन याञा संपविली. सविस्तर वृतानुसार भंडारबाेडी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भिमणटाेला येथील लक्ष्मण गुलाबराव धुर्वे वय २७ व मैनावती असुराज धुर्वे वय ३८ हे नात्याने सख्खे चुलत दिर व वहिणी आहेत.त्यांच्यात प्रेम निर्माण झाले.यात लक्ष्मण धुर्वे हा अविवाहित तर मैनावती ही विवाहित असुन तिला एक आठ वर्षाचा मुलगा आहे. असुराज धुर्वे याचे हे दुसरे लग्न आहे.पहिली पत्नी बाळंपणात मरण पावली. त्याने दुसरे लग्न मैनावती साेबत केले त्याला पहिल्या पत्नी पासुन तीन मुली आहेत. भिमणटाेला येथुन हे प्रेमी युगल ९ जून ला गावातुन बेपत्ता झाले.त्यामुळे असुराज धुर्वे याने रामटेक पुलीस स्टेशनला पत्नी बेपत्ता असल्याचा रिपाेर्ट दिला.पण ती काही सापडली नाही. दिनांक ६ जुलैच्या राञी हे प्रेमी युगल भिमणटाेला येथे परत आले.आपल्याला समाज स्विकारणार नाही या भितीने ते गावात गेले नाही.गावाच्या बाजुला खदाणीचा माेठा खड्डा आहे.तेथे हे गेले व त्यांनी तेथे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.स्वतः जवळील दाेन्ही बॅग चप्पल,माेबाईल व इतर साहित्य पाण्याच्या बाजुला ठेवले व पाण्यात उडी घेवुन आत्महत्या केली.

दि.६ जुलै ला काही नागरिक तिकडे गेले असता त्यांना महिलेचे प्रेत तरंगतांना दिसले.तिथे असलेल्या आधार कार्डावरुन ही मैनावती असल्याचे स्पष्ट झाले.त्यांनी लगेच ही माहिती रामटेक पोलीस स्टेशन ला दिली.पोलीस निरीक्षक प्रमाेद मकेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली.दाेन बॅग असल्याने लक्ष्मण याचेही प्रेत पाण्यात आहे हे स्पष्ट झाले.प्रेत काढण्याचा प्रयत्न केला.पण राञ झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आले. दि.७ जुलैला सकाळी ८ वा. लक्ष्मणचेही प्रेत नाल्यावर तरंगतांना दिसले. दाेन्ही शव शवविच्छेदनासाठी रामटेकच्या जिल्हा उपरुग्नालय येथे पाठविण्यात आले.त्यांचे प्रेत शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.पोलीसांनी या प्रकरणी कलम १७४ सीआरपीसी नुसार मर्ग दाखल करण्यात आले.पोलीस निरीक्षक प्रमाेद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार व शिपाई जितेंद्र चाैधरी पुढील तपास करीत करीत आहेत. 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …