Breaking News

*विदर्भ पंढरी धापेवाड्यात आषाढि एकादशी ला विठ्ठल नामाची वारकऱ्यांची शाळा भरली….* *तीन वर्षानंतर प्रथम च भाविकांचा मेळा..*

*विदर्भ पंढरी धापेवाड्यात आषाढि एकादशी ला विठ्ठल नामाची वारकऱ्यांची शाळा भरली….*


*तीन वर्षानंतर प्रथम च भाविकांचा मेळा..*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा या तिर्थस्थळाला विदर्भाची पंढरी म्हणून ख्याति प्राप्त आहे धापेवाडा येथे चंद्रभागेच्या तीरी स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज भाविकांची गर्दी उसळली आहे..विठ्ठल नामाचा कर्णप्रिय गजर व टाळमु्दंगाच्या तालावर भजन व अभंग ऐकायला येत आहे.. कोरोना महासंकटानंतर प्रथमच भाविकांची मांदियाळी दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे.*


*च्या दिवशी हजारोंच्या संख्येने विदर्भासह मध्य प्रदेश ,छत्तीसगड व इतर ठिकाणाहून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात कोरोना काळा नंतर प्रथमच होत असलेल्या या यात्रेला ३०० ते ३५० दिंड्या येथे गुरुपौर्णिमा पर्यंत येण्याची शक्यता आहे..भाविकांच्या निवासाची व्यवस्था कोलवास्वामी मठ परिसरात करण्यात येईल..येथे येणाऱ्या भाविकांची ग्रामस्थ आस्थेने देखभाल करतात त्यांना भोजन,पाणी,अन्य सुविधा मिळवून देण्या करिता प्रयत्नरत असतात..भाविकांसाठी यात्रे करिता एस टी महामंडळ च्या वतीने। बस सेवा नागपूर, कळमेश्वर, मोहपा,सावनेर,काटोल आदी ठिकाणाहून करण्यात आलेली आहे.*


*तर पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत कायदा व सुव्यवस्था रहावी या करिता सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांच्या नेतृत्वाखाली ठीकाणी पोलीस बंदोबस्त तसेच स्वयसेवी संस्थांचे सहकार्य घेतल्या जात आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …