Breaking News

*प्रतिक लाँजवर स्थानिक पोलिसांची धाड़* *तीन तरुण जोडप्यांना चौकशीअंती सोडले*

*प्रतिक लाँजवर स्थानिक पोलिसांची धाड़*


*तीन तरुण जोडप्यांना चौकशीअंती सोडले*

सावनेर : सावनेर शहरातील लाज चालकांची मनमानी वृत्ती, रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने उघडकीस येत असल्याने शहरातील लाज व्यवसाय रोज नवीन चर्चेचा विषय बनत आहे.*

*शहरातील प्रतीक लांजमधे दि.10 जुलै रोजी घडलेल्या पती-पत्नीचे हायव्होल्टेज ड्रामयाला चोवीस तास लोटत नाही तर सावनेर पोलीस ठाण्याचे मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली 11 जुलै रोजी अचानक केलेल्या कारवाईत प्रतीक लांजमधून परत तीन तरुण जोडपे प्रेमीयुगुलांना अटक करण्यात आली.त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तिथे योग्य चौकशी करून त्यांना सोडण्यात आले असुन यात काही विद्यालयीन विद्यार्थीही असल्याची दबल्या आवाजात बोलल्या जात आहे.*


*संकेत लाजमध्ये तरुणाची आत्महत्या, केशव लाउंजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, सूर्या लाजमे स्थानिक पोलिसांनी छापा टाकून अर्धा डझन प्रेमी युगल, प्रतीक लाजमे, पती-पत्नी आणि वो प्रकरणानंतर आज तीन जोडप्यांच्या प्रेमीयुगुलांची उपस्थिती आदीं सततच्या घटनांवर विचार केला असत शहरातील सर्व लाँज चालक स्वतःला शहराचे भाई समजुन धोरणांचा खुलेआम धुडगूस घालत असल्याचे चित्र आहे*


*११ जुलै रोजी प्रतीक लाँजमधे झालेल्या कारवाईत अनियमितता आढळून आल्याने व्यवस्थापक व नितीन भाऊराव शेडामे ३७, हनुमान मंदिराजवळ, दाभा बस्ती, धरमपेठ नागपूर व मालक राजेंद्र अशोक कारेमोरे सटवमाता मंदिर बस स्टँड सावनेर, या दोघांवर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर उपरोल्‍लेखित लाज चालक मालक, जिल्‍हादंडाधिकारी नागपूर, उपविभागीय दंडाधिकारी व सावनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी मारुती मुळुक यांनी पाठविलेल्या जाफौ.149, आदेशाची अवहेलना व उलंघन केल्याचे निदर्शनास येताच सदरच कारवाई करण्यात आली तर स्थानिक पोलीसांचे सततचे धाडसत्र सुरु असल्याने लाज संचालकांचे धाबे दणाणले आहेत.*


*सावनेर पोलीस स्टेशनचे पो.नि. मारुती मुळूक यांनी आमच्या स्थानिक प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, शहरातील सर्व लाजवर स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाला दैनंदिन तपास व कारवाईचे आदेश देण्यात आले असुन सदरहू कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे ठाम पने सांगितले सदर कारवाईत एपीआय शिवाजी नागवे यांच्या नेतृत्वाखाली मनिषा बंडीवार, सुप्रिया पाटील, अतुल खोडणकर,प्रकाश ठोके आदींनी कारवाईत सहभाग घेतला*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …