Breaking News

*कन्हान पोलीस स्टेशन येथे शांती समिति ची बैठक संपन्न* *कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे पोलीस निरीक्षकांचे नागरिकांना आवाहन*

*कन्हान पोलीस स्टेशन येथे शांती समिति ची बैठक संपन्न*

*कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे पोलीस निरीक्षकांचे नागरिकांना आवाहन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन येथे बकरी ईद निमित्य शांती समिति ची बैठक आयोजित करण्यात आली‌ असुन या बैठकी मध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी नागरिकांशी चर्चा करुन कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे व शांततेत सण उत्सव साजरा करण्याचे आव्हाहन केले आहे .


बुधवार दिनांक २९ ला दुपारी ११:०० ते १२:०५ पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बकरी ईद निमित्य शांती समिति ची बैठक आयोजित करण्यात आले असुन या बैठकी मध्ये सुन्नी रजा मस्जिद , पटेल नगर कन्हान , अंजुमन रजा मस्जिद खदान नंबर 3 , व अम्मा ताजी मरियम दरगाह गाडेघाट येथील पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी आगामी बकरी ईद सण लक्षात घेऊन शासनांच्या नियमांचे पालन व परिपत्रकानुसार माहिती देऊन पालन करण्याचे आव्हाहन केले असुन कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी नागरिकांना केले आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …